डाॅ.सुरेश भोसले आधुनिकतेचा नेता

डाॅ.सुरेश भोसले आधुनिकतेचा नेता
(गोरख तावरे)
सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांनी सहकार क्षेत्रात जे सामान्य शेतकरी व शेतक-यांच्या मुलांसाठी केलेले काम अतुलनीय आहे.30 वर्षे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील शेतक-यांचे जीवनमान उंचवावे,आर्थिक सुबत्ता यावी यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.याचा विसर कार्यक्षेत्रातील सभासदांना पडता उपयोगाचा नाही.अनेक आरोपांचा सामना करीत जयवंतराव भोसले यांनी कल्पकतेने भागाचा विकास करताना सहकाराचा चांगला उपयोग केला आहे.राजकीय मतभेदापलीकडे विचार करून जयवंतरावआप्पांनी शेतीला पुरक अनेक संस्था उभ्या केल्या आहेत.हे सांगण्याचा हेतु काय ? तर सध्या कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीचा राजकीय धुरळा उडू लागला आहे.

जयवंतरावआप्पांच्या पश्चात डाॅ.सुरेश भोसले त्याच मार्गाने वाटचाल करीत आहेत.शांत,संयमी व्यक्तीमत्व म्हणून सुरेशबाबांकडे पाहिले जाते.कृष्णाच्या गतकाळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना सुरेशबाबांनी "कृष्णा"ला आधुनिकतेची जोड दिली.नविन तंत्रज्ञानाचा स्विकार केला.भागात उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्दतेसाठी शिक्षणांचे विविध विभाग व शाखा सुरू केल्या यामुळे कृष्णाच्या सभासदांची मुलं उच्चशिक्षीत झाली आहेत.देशाबरोबर परदेशात कृष्णांच्या सभासदांची मुलं यशस्वी कामगिरी करीत आहेत.  शेतकरी वर्गाचा व "कृष्णा"च्या कार्यक्षेत्रातील सामान्यांचा विकास हेच ध्येय डोळयासमोर ठेवून सुरेशबाबा कार्यरत आहेत.सहकारमहर्षींचा वसा व वारसा आधुनिकतेकडे घेवून जाणारे व्यक्तीमत्व म्हणून डाॅ.सुरेशबाबा भोसलेंकडे पाहिले जाते.

दरम्यान मोहिते-भोसले मनोमिलनानंतर कृष्णांत सत्तांतर झाले.विधानसभा निवडणूकीत याच कौटुंबिंक मोहिते - भोसले मनोमिलनाला नजर लागली आणि पुन्हा मोहिते - भोसले वेगळे झाले आहेत.माजी आमदार विलासकाका व भोसले कुटुंबांचा दुरावलेला ऋणानुबंध पुन्हा संवादाने एक झाला आहे.यामुळे विधानसभा निवडणूकीत "कोण काय बोलले" हे विसरून विलासकाका व सुरेशबाबा एकत्र आले आहेत.याहीपुढेचे पाऊल डाॅ.अतुलबाबांनी उचलले व विलासकाकांचे सुपुत्र अॅड.उदयसिंह पाटील यांची भेट घेवून नविन राजकीय मैत्री केली आहे.भोसले-पाटील यांची जुनीच वायवाट नव्या युवानेत्यांनी सुरू ठेवण्यांचा निर्णय घेतला आहे.विलासकाका व सुरेशबाबा यांच्या मदतीला आता अतुलबाबा व उदयसिंहदादा राजकीय जुळणी करणार आहेत.यामुळे "कृष्णा"ची होऊ घाललेली निवडणूक गाजणार आहे.कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची घोषणा झाली आहे.कृष्णाचे सभासद "भाग्यवान" म्हटले पाहिजेत.कारण एकापेक्षा एक नेतृत्वगुण संपन्न व्यक्तीमत्व कृष्णाच्या कार्यक्षेत्रात आहेत..सुरेश भोसले आधुनिकतेचा नेता
(गोरख तावरे)
सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांनी सहकार क्षेत्रात जे सामान्य शेतकरी व शेतक-यांच्या मुलांसाठी केलेले काम अतुलनीय आहे.30 वर्षे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील शेतक-यांचे जीवनमान उंचवावे,आर्थिक सुबत्ता यावी यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.याचा विसर कार्यक्षेत्रातील सभासदांना पडता उपयोगाचा नाही.अनेक आरोपांचा सामना करीत जयवंतराव भोसले यांनी कल्पकतेने भागाचा विकास करताना सहकाराचा चांगला उपयोग केला आहे.राजकीय मतभेदापलीकडे विचार करून जयवंतरावआप्पांनी शेतीला पुरक अनेक संस्था उभ्या केल्या आहेत.हे सांगण्याचा हेतु काय ? तर सध्या कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीचा राजकीय धुरळा उडू लागला आहे.

जयवंतरावआप्पांच्या पश्चात डाॅ.सुरेश भोसले त्याच मार्गाने वाटचाल करीत आहेत.शांत,संयमी व्यक्तीमत्व म्हणून सुरेशबाबांकडे पाहिले जाते.कृष्णाच्या गतकाळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना सुरेशबाबांनी "कृष्णा"ला आधुनिकतेची जोड दिली.नविन तंत्रज्ञानाचा स्विकार केला.भागात उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्दतेसाठी शिक्षणांचे विविध विभाग व शाखा सुरू केल्या यामुळे कृष्णाच्या सभासदांची मुलं उच्चशिक्षीत झाली आहेत.देशाबरोबर परदेशात कृष्णांच्या सभासदांची मुलं यशस्वी कामगिरी करीत आहेत.  शेतकरी वर्गाचा व "कृष्णा"च्या कार्यक्षेत्रातील सामान्यांचा विकास हेच ध्येय डोळयासमोर ठेवून सुरेशबाबा कार्यरत आहेत.सहकारमहर्षींचा वसा व वारसा आधुनिकतेकडे घेवून जाणारे व्यक्तीमत्व म्हणून डाॅ.सुरेशबाबा भोसलेंकडे पाहिले जाते.

दरम्यान मोहिते-भोसले मनोमिलनानंतर कृष्णांत सत्तांतर झाले.विधानसभा निवडणूकीत याच कौटुंबिंक मोहिते - भोसले मनोमिलनाला नजर लागली आणि पुन्हा मोहिते - भोसले वेगळे झाले आहेत.माजी आमदार विलासकाका व भोसले कुटुंबांचा दुरावलेला ऋणानुबंध पुन्हा संवादाने एक झाला आहे.यामुळे विधानसभा निवडणूकीत "कोण काय बोलले" हे विसरून विलासकाका व सुरेशबाबा एकत्र आले आहेत.याहीपुढेचे पाऊल डाॅ.अतुलबाबांनी उचलले व विलासकाकांचे सुपुत्र अॅड.उदयसिंह पाटील यांची भेट घेवून नविन राजकीय मैत्री केली आहे.भोसले-पाटील यांची जुनीच वायवाट नव्या युवानेत्यांनी सुरू ठेवण्यांचा निर्णय घेतला आहे.विलासकाका व सुरेशबाबा यांच्या मदतीला आता अतुलबाबा व उदयसिंहदादा राजकीय जुळणी करणार आहेत.यामुळे "कृष्णा"ची होऊ घाललेली निवडणूक गाजणार आहे.कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची घोषणा झाली आहे.कृष्णाचे सभासद "भाग्यवान" म्हटले पाहिजेत.कारण एकापेक्षा एक नेतृत्वगुण संपन्न व्यक्तीमत्व कृष्णाच्या कार्यक्षेत्रात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.