लढवय्या नेता - मदनरावदादा मोहिते
कृष्णा निवडणूक भाग - 2
लढवय्या नेता - मदनरावदादा मोहिते
(गोरख तावरे)
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी दूरदूष्टीकोण नजरेसमोर ठेवून कृष्णा कारखान्याची स्थापना केली.राज्याच्या मंत्रीमंडळात अभ्यासू मंत्री म्हणून भाऊंची ख्याती होती.सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करता येतो.तो ही आखीव - रेखीव हे आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले आहे.महाराष्ट्राचे जेष्ठ विचारवंत म्हणून यशवंतराव मोहिते (भाऊ)यांचा आदर केला जायचा.याचा रास्त अभिमान कराड तालुक्याला आहे.याच मुशीत व विचारात घडलेले मदनरावदादा मोहिते आहेत.भाऊंच्या विचार वाटेवरून तसूभरही मदनरावदादा कधीही विचलीत झाले नाहीत."कृष्णा"च्या पहिल्या सत्तांतरानंतर व भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मदनरावदादा पहिल्यांना "कृष्णा"चे अध्यक्ष झाले.याच काळात यशवंतरावभाऊ व जयवंतरावआप्पा या दोन सख्या भावांमधील वैचारीक संघर्ष अख्या महाराष्ट्राने पाहीला आहे.
मदनरावदादा हे स्पष्ट व्यक्ते अशी त्यांची ओळख आहे.भाऊंनी आखून दिलेल्याच सहकारांतील तत्वाप्रमाणे काम करीत होते.ऊसउत्पादक शेतक-यांच्या ऊसाला चांगला दर देवून "कृष्णा"नेहमी राज्यात अग्रकंमावर ठेवण्यात मदनरावदादा यांनी नेहमी कसोशीने प्रयत्न केला यात ते यशस्वी झाले.कारखाना कार्यक्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून नविन ऊस बियानांचा प्रयोग करून प्रतीएकरी ऊस वाढीसाठी केलेल्या प्रयोगामुळे कृष्णाच्या सभासदांना आर्थिक फायदा झाला हे विसरता येणार नाही. "कृष्णा" चे सभासद यांचा विकास,ऊसाला जादा दर,शेतीला पाणी,कारखाना विस्तारीकरण यासह भागाचा सर्वांगिण विकास हे ध्येय ठेवून मदनरावदादांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.याचबरोबर भाऊंचा वैचारीक वारसा सक्षमपणे मदनरावदादांनी अंगीकारला आहे.आजही वैचारीक परंपरा कायम ठेवून कृष्णा कार्यक्षेत्रात गावोगावी कार्यकत्यांचे जाळे निर्माण केले आहे यासाठी प्रत्येकाशी चांगला संपर्क ठेवला आहे.तब्बल 10 वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना कृष्णा कार्यक्षेत्र,ऊसउत्पादक शेतकरी सभासद विकासासाठी मदनरावदादांनी चांगले काम केले आहे.ते नजरेआड न करता समाजासमोर आले पाहिजे.
होऊ घातलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकीत एक लढवय्या नेता म्हणून सभासदांसमोर आहेत.परखड,स्पष्ट,सत्याची कास धरणारे,असत्याची चीड असणारा नेता म्हणून मदनरावदादा यांच्याकडे पाहिले जात आहे.सत्ता असो वा नसो जनसंपर्कात कायम राहणारे,लोकांच्या सुख - दुःखात सहभागी होणारे मदनरावदादा गेल्या दीड महिन्यापासून कृष्णा सभासदांच्यात जागृत्ती करीत आहेत आणि परिवर्तनाची हाक देत आहेत.मोहिते-भोसले घराण्यातील एक जेष्ठ व्यक्तीमत्व ,जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांचा वैचारीक वसा व वारसा जपणारे मदनरावदादा आपल्या विचारांपासून विचतील होत नाहीत.हे विशेष म्हणावे लागेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा