...तर कृष्णेची चार स्वतंत्र युनिट असती! : डॉ. सुरेश भोसले

...तर कृष्णेची चार स्वतंत्र युनिट असती! : डॉ. सुरेश भोसलेकराडदि (सावा)कृष्णा कारखान्यावर 

योग्य नियोजन झाले असते तर गेल्या दहा वर्षांत कृष्णेचे नवीन युनिट स्थापन होऊन चार कारखाने झाले असते. इतकेच नव्हे, तर जरंडेश्‍वर आणि रयत साखर कारखानाही कृष्णेनेच चालविला असता; ते बंद पडू दिले नसते, असे मत कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन आणि सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथे कृष्णा कारखाना सभासद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बी. डी. पाटील होते.शेतकरी सभासदांना मार्गदर्शन करताना डॉ. भोसले म्हणाले, की ढिसाळ नियोजनामुळेच कृष्णा कारखाना सध्या अडचणीत आला आहे. कारखान्यावर जर चांगले नियोजन झाले असते तर कारखान्याचे विस्तारीकरण होऊन शाखा झाल्या असत्या. 1999 साली आम्ही सत्तेवर आल्यावर कारखान्याचा विस्तार केला. पण त्यानंतर मात्र कारखान्यावर आलेल्या सत्ताधार्‍यांनी मात्र कारखान्याचा कोणताही विस्तार न केल्यास कारखान्याची प्रगती खुटली आहे. आम्ही निवडणुकीत उतरलो कारण गेल्या काही वर्षात कारखाना अडचणीत आला आहे. प्रशासन कोलमडले आहे. या कारखान्याची व शेतकर्‍यांची प्रगती थांबली आहे. या कारखान्याला चांगले प्रशासन देण्यासाठी व कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीच आम्ही निवडणुक लढवित आहोत. आम्हाला सत्ता, प्रतिष्ठा नको आहे, तर शेतकर्‍याचे हित जोपासायचे आहे. सातारा विभागातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून कृष्णेचा लौकिक होता. महाराष्ट्रात याच कारखान्याने पाणीपुरवठा योजना राबविल्या. महाराष्ट्रात विक्रमी दर दिला. असे असताना मात्र आता कामगारांना वेळेत पगार नाही, उसाला दर नाही. कारखान्यावर कर्ज वाढत आहे. या सगळ्या गोष्टी कृष्णेवर स्थिरता नसल्यामुळे झाल्या आहेत. त्यामुळे कृष्णेला स्थिरता मिळवून देण्यासाठी सभासदांनी सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
एस. व्ही. पाटील, राहुल पाटील यांचेही भाषण झाले. तसेच वाळवा तालुका वकिल संघटनेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड. मनोहर पाटील यांचा डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे सभासद, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.