सातारा जिल्हयात राजकीय वातावरण तापले
सामना - 3/5/2015
कराड वार्तापत्र - गोरख तावरे
सातारा जिल्हयात राजकीय वातावरण तापले
सातारा जिल्हयात सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅक निवडणूक,आगामी कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक,पालकमंत्री विजय शिवतारे यांचा शिवसैनिकांना पांठीबा व दिलासा आणि शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा युती शासनाच्या माध्यमातून विकासाचा नवा आयाम अशा विविध घडामोडीमुळे राजकीय वातावरण गतीमान झाले आहे.बेरजेचे राजकारण व शह- काटशह आणि आरोप-प्रत्यारोंपाचा माहोल जोरदार सुरू आहे.
जिल्हा बॅकेच्या संचालक पदासाठी वजनदार राजकीय लोकांनी प्रतिष्ठापणाला लावली तर सत्तेत आपणच कायम पाहिजे यासाठी तडजोडी केल्या पक्षीय मुखवटे बाजूला सारले गेले तर राष्ट्रवादीने निष्ठावंताना बाजूला ठेवले.जेष्ठ नेते विलासकाका पाटील यांच्या अधिपत्याखाली असणारी जिल्हा बॅक राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्यापासून रामराजे निंबाळकर व लक्ष्मणतात्या पाटील संयुक्त नेतृत्व करीत आहेत.यावेळी श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी नवोदितांना संधी देण्याची भूमिका घेतल्याने प्रस्तापितांच्या 'असे काही नको'या भूमीकेमुळे काही जागा बिनविरोध झाल्या आहेत.बैठका, चर्चा मनधरणी अशा सर्व मार्गाचा अवलंब करूनदेखील जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी काही जागा बिनविरोध झाल्या आहेत.शह-काटशहाच्या राजकारणात जिल्हयातील राजकारणी मश्गुल आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी संचालक निवड होणार आहे.सातारा जिह्यातील प्रत्येक आमदार व वजनदार राजकारणी यांनी राजकीय सारीपाटावर आपापले गणित मांडले आहे.विधानपरिषदेचे सभापती रामराजे निबांळकर, विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण पाटील, शशिकांत शिंदे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर,बाळासाहेब पाटील, दादाराजे खर्डेकर या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्या सोसायटींमधून प्रभाकर घार्गे, गृहनिर्माण मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले,पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर, खरेदी विक्री संघातून लक्ष्मणराव पाटील तर मजूर मधून अनिल देसाई हे बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्विकारून रणांगण सोडले नाही.सह्याद्री कारखान्यावरच्या बैठका फोल ठरल्याचे बाळासाहेबांचा अर्ज कायम राहिल्याने स्पष्ट झाले. प्रक्रीयामधून आमदार बाळासाहेब पाटील-दादाराजे खर्डेकर लढत होणार हे स्पष्ट आहे.राष्ट्रवादी वारंवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर अन्याय करीत असल्यामुळे राष्ट्रवादीबाबत कराड तालुक्यात नाराजी निर्माण झाली आहे.सोसायटीमधून जेष्ठ नेते विलासकाका पाटील यांच्या विरोधात पैलवान धनाजी पाटील तर नागरी बॅका व पतसंस्थामधून राजेश पाटील यांच्याविरोधात प्रभाकर साबळे आहेत.दरम्यान कराडच्या तीन उमेदवारांना केवळ राजकीय सामंजस्यपणा नसल्यामुळे बिनविरोध निवड झाली नाही.विलासकाका,बाळासाहेब व राजेश पाटील निवडणूक रिंगणात आहेत.
तरुण, नव्या दमाचे शिवसैनिक द्या. त्यांना ताकद देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला आहे.आमचा शिवसैनिक आता कोपऱ्यात उभा राहता कामा नये.सत्ता आपली आहे, याची जाणीव शिवसैनिकांना झाली पाहिजे. तुम्ही विकासकामे सुचवत जावा असा सल्ला सातारा जिल्हयातील शिवसैनिकांना विजय शिवतारे यांनी दिला आहे.शिवतारे बांपूनी शिवसैनिकांबाबत घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे शिवसैनिकांच्यात जोश निर्माण झाला आहे.दरम्यान प्रशासकीय विभाग व पोलिस खाते अद्याप काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करत असल्याची चर्चा असून बैठका व मंत्री यांच्या कार्यक्रमांना शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत.स्वाभिमानी शिवसैनिकांना पाठबळ मिळणार असल्याने आता लुच्चेगिरी करणा-या अधिका-यांचा खरा चेहरा समाजासमोर येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाळव्याचे आमदार जयंत पाटील, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना दिक्षांत समारंभाला निमंत्रण देवून डाॅ.सुरेश भोसले,डाॅ.अतुल भोसले यांनी आगामी कृष्णा कारखान्यांच्या निवडणूकीची साखर पेरणी करून बेरजेचे राजकारण सुरू केले आहे.कृष्णात तीन पॅनेल होणार असल्याने प्रत्येक पॅनेलप्रमुख राजकीय जुळणी करण्यात व्यस्त आहेत.यामुळे सत्ताधारी अविनाश मोहिते विरोधी मदनदादा व डाॅ.इंद्रजीत मोहिते आणि डाॅ.सुरेश भोसले,डाॅ.अतुल भोसले यांची कसोटी आहे. मुख्यमंत्र्यांना विकासनिधीबाबत शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी निवेदन देऊन पाटणचा चौफेर विकासाचा भगीरथ दौडतच ठेवला आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनकाळात सुमारे 100 कोटी रूपयाचा निधी केवळ पाटण तालुक्यासाठी आणण्यात आमदार शंभूराज देसाई यांना यश आले आहे.सातारा जिल्यात काॅग्रेस व राष्ट्रवादी गटा-तटात आणि व्यतिगत पदांसाठी आरोपांचा धुरळा उडवित आहे.तर शिवतारेबापू व शंभूराज देसाई हे सातारा जिल्यात विकास काम करण्याच्या कामांना अग्रक्रंमांक देत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा