संपादक-प्रकाशकांनी ऑनलाईन फाॅम भरावा - गोरख तावरे


संपादक-प्रकाशकांनी ऑनलाईन फाॅम भरावा - गोरख तावरे

कराड दि.(सावा) केंद्र शासनाच्या आरएनआय ला महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांनी प्रतीवर्षाप्रमाणे वार्षीक विवरण पाठवणे आवश्यक आहे.सध्या ऑनलाईन वार्षीक विवरण भरावे लागणार आहे.31 मे 2015 अंतीम तारीख आहे.तेव्हा दैनिक,साप्ताहिक,पाक्षीक,मासिक आणि अन्य प्रकाशित होणा-या वृत्तपत्रांच्या संपादक,प्रकाशकांनी वार्षीक विवरण ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.असे प्रसिध्दीपत्रकात प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी म्हटले आहे.

www.rni.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन फाॅर्म उपलब्द 
आहे.काही अडचण आल्यास गोरख तावरे (9423502355 /
9326711721) यांच्याशी संपर्क साधावा विनामोबदला सहकार्य केले जाईल अशी हमी देवून पत्रकात म्हटले आहे की,काही तथाकथीत व्यक्ती संपादक व प्रकाशकांना फसवून ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठी पैशाची मागणी करीत आहेत यापासून सावध रहावे.विनाशुल्क ऑनलाईन फाॅर्म भरता येतो लेखा परिक्षकांचे पत्र सोबत जोडणे, अंक विक्रीची माहिती आवश्यक आहे.असेही पत्रकात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.