३५0 रूपये कमी देणार्यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये - अविनाश मोहिते
३५0 रूपये कमी देणार्यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये - अविनाश मोहिते
|
कराड -कारखान्याच्या इतिहासात या पाच वर्षात सभासदांना मालकाचा दर्जा दिला.४८ हजार सभासदांना २ रु. किलो दराने साखर देणारा कृष्णा कारखाना एकमेव असून शेजारच्या कारखान्यापेक्षा ३५0 रुपये दर कमी देणार्यांनी ऊस दरातील फरकाबद्दल बोलू नये, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा कारखान्याचे चेअरमन अविनाश मोहिते यांनी केले. कार्वे, कोडोली (ता.कराड) येथे झालेल्या सभासद संपर्क दौर्यात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते अँड़ बाळासाहेब शेरेकर, कृषिमित्र अशोकराव थोरात, कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव, जयशंकर यादव,उपस्थित होते. अविनाश मोहिते म्हणाले, १९८९ पासून कारखान्याचा कारभार सभासदांनी तपासून पहावा. सभासदांना सन्मानाची वागणूक कोणी दिली. २ रुपये दराने देण्यात येणारी साखर १४ रुपये दराने कोणी केली. इरिगेशन योजनांना १६ तास अखंडीत वीज कोणाच्या काळात मिळाली. कारखान्याच्या मालकीची १५७ एकर जमीन लाटण्याचा कोणी प्रय▪केला. सभासदांना दीर्घ आजारासाठी मदत कोणी दिली. इतर कारखान्याच्या बरोबरीत ऊस दर कोणी दिला. १00 रुपये फाइनल बिल कोणी बुडविले. या सर्वांचा विचार करुन सभासदांनी संस्थापक पॅनेलच्या पाठीशी ठाम उभे रहावे. कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहण्यासाठी योग्य तो निर्णय सभासदांनी घ्यावा. अशोकराव थोरात म्हणाले, कृष्णा कारखान्याची सत्ता ३५ वर्षे एका कुटूंबाकडे, १५ वर्षे दुसर्या कुटूंबाकडे व ही ५ वर्षे अविनाश मोहिते यांच्याकडे आहे. सभासदांचे हित चांगल्या प्रकारे कोणी बघितले, याचा विचार सभासदांनी केला पाहिजे.अँड़ बाळासाहेब शेरेकर म्हणाले, सहकारातून समृध्दी हा सहकाराचा मुळ मंत्र आहे. मात्र कृष्णेच्या राजकारणात सभासदांची समृध्दी न करता काहींनी स्वत:ची समृध्दी करून घेतली. सुनिल कणसे, शिवाजी पाटील, गुणवंतर पाटील यांची भाषणे झाली. |

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा