कृष्णा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.अतुल भोसले

कृष्णा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.अतुल भोसले
कराड, ता. 21 (सावा)कृष्णा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्षपदी दामाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी एस. टी. गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडी जाहीर करण्यात आल्या.
नूतन चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल आभार मानताना; कृष्णा बँकेला देशातील अग्रगण्य बँकेचा बहुमान पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय व्यक्त केला.
कृष्णा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये नूतन संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून डॉ. अतुल भोसले, दामाजी मोरे, शिवाजी थोरात, प्रदीप थोरात, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, हणमंत पाटील, बाळासो पवार, रणजीत लाड, महादेव पवार, चंद्रहास जाधव, नामदेव कदम, महिला गटातून मालन जगताप,नंदाताई थोरात, अनुसूचित जाती गटातून तातोबा थोरात, विमुक्त जाती गटातून दिनकर गडाळे,इतर मागासप्रवर्गातून संतोष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे मार्गदर्शक संचालक डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्तेही नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.अतुल भोसले म्हणाले,सहकारमहर्षी स्व. जयवंतरावआप्पांनी घालून दिलेल्या आदर्श पायवाटेवरून चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या संचालक मंडळाने केला.1989 नंतर सहकारात शिरलेल्या राजकारणामुळे काही दृष्ट प्रवृत्तींनी बँकेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण सुरेशबाबांनी या प्रवृत्तींशी मुकाबला करून बँकेला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे सर्वसमावेशक नेतृत्व आता जनतेलाच हवे आहे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले शेतकर्‍याला मदत व्हावी याच उद्देशाने या बँकेची स्थापना झाली आहे.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांनी प्रास्तविक केले.शिवाजी थोरात यांनी आभार मानले. याप्रसंगी बँकेचे सर्व आजी-माजी संचालक, सभासद, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.