शेतकर्‍यांना न्याय देणेस कटीबध्द - आ.बाळासाहेब पाटील


    कराड (लक्ष्मीपुत्र) - स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या कल्पक दृष्टीकोनातून सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली.व आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी योग्य नियोजन व दुरदृष्टीतून महाराष्ट्रामध्ये हा कारखाना आदर्शवत होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकर्‍यंाना न्याय देण्यास कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी नलवडेवाडी येथे केले.

    नलवडेवाडी ता.कोरेगाव येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निधीतून व विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुुनिल माने होते. याप्रसंगी कोरेगाव पंचायत समितीेचे सभापती राजाभाऊ जगदाळे, खटाव पंचायत समितीचे सभापती संदिप मांडवे, कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रतापराव कुमुकले, कोरेगाव प.स चे उपसभापती संजय साळंखे, बाळासाहेब सोळस्कर, कोरेगाव प.स चे माजी उपसभापती कांतीलाल पाटील (तात्या) यांची प्रमुख उपस्थिती होती.

    आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, या विभागाने नेहमीच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची पाठराखण केली असून, या विभागाचा व माझा सह्याद्रि कारखान्याच्या माध्यमातून पूर्वीपासून जिव्हाळा होता तो विधानसभेमुळे वृधिंगत झाला आहे, चव्हाण साहेबांनी सह्याद्रिची स्थापना केली व आदरणीय पी.डी.पाटील साहेबांनी त्याचे योग्य नियोजन करून कार्यक्षेत्रामधील जमिनी बागायत करणेसाठी अथक प्रयत्न करून शेतकर्‍यंाच्या जीवनामध्ये आर्थिक परीवर्तन घडवले, या गावातील शेतकर्‍यंानी शेतीला पाणी देणेसाठी अग्रक्रम दिला आहे, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी कारखाना क्षेत्रामध्ये सहकारी तत्वावरील अनेक लहाण मोठया उपसा जलसिंचन योजना पूर्ण करून संपूर्ण शेती बागायत होण्यासाठी प्रयत्न केले.

    सभासदांचा कारखान्या-वरील विश्‍वास व श्रद्धा यामुळेच हे शयय झाले, सध्या हेयटरी उत्पादन वाढल्याने काही अडचणी आल्या आहेत, त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने विकासकामासाठी कटीबध्द आहे, परंतू सध्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक विकासाच्या कल्पना ठप्प झाल्या आहेत. अनुशेषाच्या नावाखाली पश्‍चिम महाराष्ट्राकडे सापत्न भावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे या पुढील काळात एकसंघ राहणे आवश्यक आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषीमंत्री असताना शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात येवून शेतकर्‍यंाना दिलासा मिळाला होता, परंतू सध्याच्या शासनाकडून तशा प्रकारचे निर्णय होताना दिसत नाहीत.काही देण्यापेक्षा न देण्याकडे शासनाचा कल असल्याचे दिसते. यागावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत सहभाग घेतल्यास कारखान्याच्या-वतीने जे.सी.बा. पोकलॅन उपलब्ध करून देण्यास सहकार्य करण्यात येईल, गावातील ग्रामस्थांनी नेहमी आपापसातील मतभेद विसरून ऐक्य वाढवावे व गावचा विकास साधावा असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने म्हणाले, कराड उत्तर मतदार संघाला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने कर्तव्यदक्ष व कल्याणकारी लोकप्रतिनिधी मिळाले आहेत.त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची विकास कामे झालेली आहेत, विकास हि न संपणारी प्रकिया असून उर्वरीत विकास कामांसाठी मतभेद विसरून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहनही केले.यावेळी बाळासाहेब पाटील (सोळस्कर) व जितेंद्र भोसले यांनी आपली मनोगतामध्ये आमदार बाळासाहेब पाटील हे संयमी, सुसंकृत व सर्वसामान्यांच्या अडचणींची जाण असणारे नेतृत्व फुलविण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन केले.कांतीलाल पाटील यांनी गावामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून लाखो रूपयांच्या पूर्ण झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला.यावेळी अक्षय नलवडे, यादव सर, लता सुतार यांनी आपले मनेागत व्यक्त केले.

    कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले, कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, भास्करराव गोरे, नंदकुमार पाटील, अविनाश माने, संजय कुंभार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.डी.पाटील, शाखा अभियंता देशपांडे, विजय नलवडे, पांडुरंग गायकवाड, संभाजीराव धुमाळ, काकासाो गायकवाड, राहूल साबळे, संजय साळुंखे, किशोर गायकवाड, विलास भोसले, नंदकुमार पाटील, लक्ष्मण निकम, राजेंद्र घाडगे, आनंदराव निकम, शिवाजीराव जाधव, संपतराव बुधावले, तानाजी राऊत, युवराज गायकवाड, विकास कदम, सौ.लता रमेश सुतार, प्रल्हाद जाधव, मोहन नलवडे, दत्तात्रय उबरे, सदाशिव नलवडे, जगन्नाथ नलवडे, तुषार जाधव, संतोष जाधव,दादासाो नलवडे, गुलाबराव वाघ, विजय पवार, दादासाो थोरात, वसंतराव निकम, रामचंद्र नलवडे, किसन यादव उपस्थित होते.सुत्रसंचालन रामचंद्र नलवडे यांनी केले, प्रास्ताविक प्रल्हाद जाधव यांनी केल व आभार जगन्नाथ नलवडे यांनी मानले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.