योगगुरु रामदेव बाबांची योगसाधना कराडकरांना लाभदायक

 एप्रिल महिन्यामध्ये रामदेवबाबा कराडमध्ये येणार आहेत. ही आनंदवार्ता कराड कराडकरांसाठी म्हणता येईल. रामदेवबाबांनी संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले आहे. योगसाधनेमुळे अनेक आजार बरे होतात, हे सप्रमाण सिद्ध केले आहे. योगसाधनेमुळे दुर्धर आजार बरे होतात, त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये उत्साह राहण्यासाठी योगसाधवा महत्त्वाची आहे. अनेक सामान्यजन रामदेवबाबांचे योगसाधवा पाहून नियमीत योग करीत आहेत, यामुळे अनेकांचा उत्साह वाढतो आहे. तर अनेकांचे आजार बरे झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी रामदेवबाबांना कराडमध्ये येण्याचे निमंत्रण दिले, आणि त्यांनी ते स्वीकारले आहे. प्रत्यक्ष रामदेवबाबांच्या सानिध्यात राहुल योगविद्या अनेकांना शिकता येणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये योगविद्येला अनन्य साधारण महत्त्व आहे. योग विद्येमुळे अनेक व्याधी बर्या होतात, त्याचबरोबर मन प्रसन्न, ताजेतवाने राहण्यासाठी योग विद्या महत्त्वाचीच आहे. संपूर्ण जगात रामदेवबाबांचे भक्त मोठय़ा प्रमाणात आहेत. योगविद्या शिकवण्यासाठी व प्रबोधनासाठी रामदेवबाबा संपूर्ण देशात फिरत असतात, याचबरोबर जगभरामध्ये ही त्यांचा प्रवास सुरू असतो. भंपक बुवाबाजी करणाऱयांच्या नादाला लागण्यापेक्षा रामदेवबाबांच्या योग साधनेचा सहारा घेणे कधीही चांगले म्हणता येईल.

सध्या समाजामध्ये भंपक बुवाबाजी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. आणि असे बाबा भक्तांना गैरमार्गाला लावत आहेत. आपण देवाचे अवतार आहोत, असा भास निर्माण करून अनेक भंपकबाबा भक्तांना मोहजाळात अडकतात, आणि आपला हेतू साध्य करून घेतात, वास्तविक पाहता डोळसपणे प्रत्येक बाबांच्याकडे बघितले पाहिजे. अन्यथा चांगल्या भक्तांचा बळी जातो आणि आपण ज्या बाबांच्यावर विश्वास ठेवला, तेथे दगाफटका होतो. म्हणूनच रामदेवबाबा सर्वांपेक्षा श्रेष्ठ व भक्तिमय वाटतात. कोणत्याही देवधर्माच्या नादाला लागण्यापेक्षा रामदेवबाबांच्या योग साधनेचा मार्ग स्वीकारणे केव्हाही चांगलेच मानता येईल. योग साधना करण्यासाठी आर्थिक झळ बसत नाही, केवळ शारीरिक हालचाली करून योग साधना करावयाची आहे. डॉ. अतुल भोसले यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून डॉ. अतुल भोसलेंचा अध्यात्माकडे अधिक ओढा निर्माण झाला आहे. असे म्हटल्यास गैर होणार नाही.

समाजकारण, राजकारण, सहकार, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अतुल भोसलेंचे कार्य उत्तुंग आहे. सध्या डॉ. अतुल भोसले यांनी अध्यात्मिक क्षेत्रात सुरू केलेले काम वाखाणण्याजोगेच आहे. योगगुरु रामदेवबाबा कराडमध्ये येतात, ते केवळ अतुल भोसले यांनी सकारात्मक प्रयत्न केले आहेत. कराडकरांना त्याचा लाभ व्हावा. या उदात्त हेतूने, निष्कर्म भावनेने अतुल भोसले यांनी योगगुरू रामदेवबाबांना कराडमध्ये पाचारण केले आहे. केवळ डॉ. अतुल भोसले यांच्यामुळेच रामदेवबाबांचे दर्शन कराडकरांना होणार आहे. १४ एप्रिल ते १६ एप्रिल या वेळेत योगशिबीर, शेतकरी मेळावा, महिला मेळावा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉ. अतुल भोसले यांनी स्वामी रामदेव बाबा यांची सोलापूर येथे ना. सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आणि कराडमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले. रामदेव बाबानी कराडचे निमंत्रण तात्काळ स्वीकारले आहे.

एप्रिल महिन्यांमध्ये कराडकरांना रामदेवबाबांच्या योगसाधनेचा, अध्यात्मिक प्रवचनांचा लाभ होणार आहे. कराडची भूमी ही जशी राजकीय परिपक्व आहे. तसेच अध्यात्माबाबत ही जुनी परंपरा असणारी भूमी आहे. संत सखू ते संत फुटाने इथपर्यंतचा आध्यात्मिक प्रवास अत्यंत सुंदर आहे. कराडला संत परंपरेचा वारसा आहे. अलीकडच्या काळातील बंडातात्या कराडकर यांचेही अध्यात्मातील काम दखल घेण्याजोगे आहे. त्याचबरोबर ते अध्यात्माबरोबर सामाजिक कामातही अग्रेसर असतात. कराड तालुक्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील योगसाधनेचा लाभ घेऊ इच्छिणारे साधकांनी एप्रिल महिन्यांमध्ये रामदेवबाबांच्या योग साधनेत सहभाग घ्यावा. अंतरमन शुद्धीकरणाबरोबर योगसाधनेचे परिपूर्ण प्रशिक्षण प्रत्यक्ष रामदेव बाबांकडून घ्यावे.

गोरख तावरे, कराड
9326711721


टिप्पण्या

  1. नशीबवान...कराडकर...
    रामदेवबाबांच्या सहवासाचा लाभ मिळणे भाग्याचे.हे भाग्य घडवून देणारे अतुल बाबांचे धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. नशीबवान...कराडकर...
    रामदेवबाबांच्या सहवासाचा लाभ मिळणे भाग्याचे.हे भाग्य घडवून देणारे अतुल बाबांचे धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.