विश्वास नांगरे - पाटील कारवाई कराच !
बैलगाडी शर्यतीवर सध्या महाराष्ट्रामध्ये बंदी आहे .या बंदीमुळे अनेक बैलगाडी शोकिन नाराज आहेत. बैलगाडी शर्यत पुन्हा पूर्ववत करावी, यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लढा न्यायालयीनस्तरावर लढला जात आहे. शासन शासनस्तरावर संमती द्यावी म्हणून अनेक संघटना प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात गावांच्या जत्रा असतात, यावेळी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जात होते. प्राणीमित्रांच्या म्हणण्यानुसार बैलगाडी शर्यतीमुळे बैलांच्यावर (प्राण्यावर) अन्याय होतो, यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी घालावी, ही त्यांची प्रमुख मागणी असल्याने सध्या बैलगाडी शर्यतींवर महाराष्ट्रात बंदी आहे.दरम्यान ऊस वाहतूक करताना बैलांना प्रचंड यातना होतात, याबाबत प्राणीमित्र का काही बोलत नाहीत ? असे बोलले जात होते. बैलगाडी शर्यतीपेक्षा ऊस वाहतूक करताना मुक्या बैलांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात, ही खरी वस्तुस्थिती आहे. याची दखल प्राणी मित्रांनी घेतली नसली, तरी सातारा जिल्हा पोलिसांनी बैलगाडीची दखल घेतली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चसलकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
बैलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात ऊस वाहतूक करणार्या 64 बैलगाडी चालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या कारवाईमुळे प्राणीप्रेमी तसेच सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. वास्तविक पाहता बैलगाडी चालक गरीब आहेत. कारवाई करण्यापूर्वी त्यांचे प्रबोधन करणे, त्यांना माहिती देणे, आवश्यक होते असेही बोलले जात आहे. कारवाई करून पोलीस रिकामे झाले, दरम्यान या गरिबांच्या पोटाचा प्रश्न कसा सुटणार ? यावर काही भाष्य केले गेले नाही, वास्तविक कायद्याने हा गुन्हा आहे. हे मान्यच आहे. दरम्यान अनेक ठिकाणी उघडपणे काही गैरव्यवसाय सुरू आहेत. याबाबत पोलीस मूग गळून गप्प आहेत. पोलिसांनी ऊस वाहतूक करणार्या बैलगाडी चालकांवर कारवाया करण्याचा धडाका लावला आहे. सातारा जिल्ह्यात ऊस वाहतुकीसाठी बैलांचा वापर केला जात आहे. या वाहतुकीदरम्यान बैलांना मारणे, कानाजवळ फिरकी लावणे, अती वजन घालणे, विश्रांती न देणे, उन्हात काम करून घेणे अशा पध्दतीने बैलांच्यावर अत्याचार होताना दिसत आहेत. केवळ सातारा जिल्ह्यातच ऊस वाहतूक करताना बैलांचा वापर होतो, असे नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बैलगाडीद्वारे ऊस वाहतूक होत आहे.
महाराष्ट्रातील संपूर्ण सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाहतूक करण्यासाठी मजूर लोक बैलांचा बैलगाडीद्वारे वापर करतात. मग सातारा जिल्ह्यातच ऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी चालकांच्यावर कारवाई करण्याचा हेतू काय ? हे स्पष्ट झाले पाहिजे. यासाठी विश्वास नांगरे - पाटील यांनी खुलासा करणे आवश्यक आहे. कारण ऊस वाहतुकीसाठी बैलांचा वापर करणे हा गुन्हा आहे. तसेच दररोज अनेक गुन्हे पोलिसांच्या डोळ्यादेखत होत असताना याकडे दुर्लक्ष का केले जात आहे ? उदाहरणच द्यायचे झाले तर, कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत महामार्गावर मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. हे पोलिसांना दिसत नाही काय ? सरसकट सर्वच पोलीस बदमाश आहेत असे नाही. तर काही प्रामाणिक व कायद्याच्या चाकोरीत काम करणारे अनेक पोलिस अधिकारी आहेत. त्यांचे जाहीर कौतुकच आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चालकांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी प्राणीमात्रांवर दया करावी, या दृष्टीने केलेले काम कौतुकास्पद आहे.
पोलिसांनी कारवाई दरम्यान जनावरांना पाणी पाजणे, वेसन काढून मुर्खी घालणे, बैलांना विश्रांती देण्यासाठी प्रयत्न करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केलेे आहे. याकडे दुर्लक्ष न करता, ज्या पोलीस अधिकारी व पोलिसांनी संवेदनशील मनाने बैलांबाबत दया दाखवली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच ! आमचा मुद्दा एवढाच आहे की, ऊस वाहतूक करणारे बैलगाडी चालक गरीब असतात, त्याचबरोबर सातारा जिल्हय़ाबरोबर इतर अनेक जिल्हय़ात अनेक गैरव्यवसाय सुरू आहेत. याबाबत पोलीस काय भूमिका घेणार ? पोलिसांची व व्यवसाय करणाऱ्यांची मिलीभगत असल्यानंतर कारवाईची अपेक्षा करणे योग्य नाही, मात्र जी कारवाई केली या अनुशंगाने पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. कारण सर्वांना न्याय समान आहे. तो पक्षपातीपणाचा होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.
गोरख तावरे, कराड
9326711721
9423502356

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा