भूमिका बदलताहेत नारायण राणे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, कोकणचे मसीहा म्हणून प्रसिद्ध असणारे नारायण राणे यांच्या सततच्या बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे, त्यांच्यावर विविध माध्यमातून टिका होऊ लागली आहे. वास्तविक पाहता नारायण राणे हे मूळचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांची प्रतिमा चांगली निर्माण झाली होती. शिवसेनेने नारायण राणे यांना अनेक संधी दिल्या, इतकेच काय पण, राज्याचे मुख्यमंत्रीपद ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. शिवसेनेमुळे नारायण राणे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व प्राप्त झाले हे विसरता उपयोगाचे नाही.
दरम्यान, मध्यंतरीच्या काळात काही प्रसंगांमुळे नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. आणि काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसने नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देतो. असे आश्वासन दिले होते. मात्र अखेरपर्यंत काँग्रेसने त्यांना झुलवत ठेवले. मात्र मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्रिपद देऊन सन्मान केला. मात्र या सन्मानाने नारायण राणे खुश झाले नाहीत. सातत्याने दिल्लीवारी करीत मला मुख्यमंत्री करा ! असा आग्रह करीत राहिले. मात्र नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. दरम्यानच्या काळात राज्यामध्ये व केंद्रात सत्तांतर झाले. आणि भाजपाचे सरकार दोन्ही ठिकाणी अस्तित्वात आले. नारायण राणे अस्वस्थ झाले, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली, आणि नेहमी सत्तेत राहण्याची सवय लागल्यामुळे सत्तेविना त्यांना चैन पडत नव्हती. भारतीय जनता पार्टीमध्ये नारायण राणे प्रवेश करणार याबाबत बरीच चर्चा झाली. मात्र भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना पक्षात घेतले नाही. तर स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला. नारायण राणे यांनी स्वाभिमानी नावाची संघटना निर्माण करून भाजपाचा सहयोगी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये प्रमुख मंत्रिपदाचा दर्जा नारायण राणे यांना हवा ! मात्र शिवसेनेची कडक भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही. दरम्यान भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवर नारायण राणे यांना संधी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणापासून आता नारायण राणे दूर राहणार आहेत. म्हणजे दिल्लीच्या राजकारणात ते कसे रमतात हे पाहणे अगत्याचे ठरेल. मीडियामध्ये नारायण राणे यांचे कौतुक केवळ त्यांचे समर्थक करीत आहेत. तर विरोधक नारायण राणे यांच्यावर टीका टिप्पणी करताना दर्जा सोडून टीका करू लागले आहेत. येणाऱ्या काळामध्ये नारायण राणे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात व दिल्लीच्या राजकारणात काय स्थान राहील ? काय महत्व राहील ? हे पाहणे गरजेचे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा