सह्याद्री आघाडीवर

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखानदारी खोलवर रुजली आहे. सहकारी साखर कारखान्यांच्यामुळे शेतकऱयांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपैकी सह्याद्री सहकारी साखर कारखाना शेतकर्यांना ऊस दर देण्याबाबत अग्रक्रमाकांवर राहिला आहे. याच पद्धतीने उसाचे गाळप करणे व साखर निर्मिती करण्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखाना अग्रस्थानी म्हणजे प्रथम क्रमांकावर आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व विद्यमान कराड उत्तर सभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कामकाज चालते आहे. योग्य नियोजन, सुसूत्रपणा, कर्मचाऱयांचे वेळेत काम करण्याचे नियोजन, यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखाना राज्यात सर्वबाबतीत अग्रक्रमावर नेहमी राहतो आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर उत्पादन गेल्यावर्षी झाले होते. तर चालूवर्षी ८ मार्चअखेर ८३ लाख ८३ हजार ८२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती झाली आहे. हे कबूल करावे लागेल. चालू हंगामात किमान ३५ ते ४० लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन होणार आहे. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीप हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यात सर्वाधिक गाळप सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने केले आहे. तर साखर उत्पादनातही सह्याद्री सहकारी साखर कारखाना आघाडीवर राहिला आहे. गतवर्षी सह्याद्री सहकारी साखर कारखाने तीन हजार रुपयांच्यावर उसाला दर देण्याचा पहिला मान मिळवला आहे. सह्याद्री कारखान्याने तीन हजार रुपये दिल्याने इतर सर्व कारखान्यांना तीन हजारापेक्षा आसपास केिवा अधिक दर द्यावा लागला. यामुळे शेतकऱ्यांचे भले झाले. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱयांना राज्यात सर्वप्रथम सर्वाधिक उसाला दर मिळाला आहे. हे शेतकरी बांधव विसरलेले नाहीत.

राज्यामध्ये सह्याद्री कारखाना प्रथम नवीन पायवाट तयार करतो. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील साखर कारखानद जाण्याचा प्रयत्न करतात, हे यश आमदार बाळासाहेब पाटील यांचे योग्य नियोजन, सुसूत्रपणा, पारदर्शकपणा, स्वच्छ कारभार, याला  दयावे लागेल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.