स्त्री जन्माचे स्वागत ही समाजाची नैतिक जबाबदारी - लक्ष्मीकांत देशमुख मसाप कराड ग्रामीण शाखेचे अध्यक्ष गोरख तावरे यांच्याहस्ते सत्कार
कराड (प्रतिनिधी) - स्त्री जन्माचे स्वागत करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी असून त्यासाठी समाजाने व शासनाने आवश्यक ती जबादारी घेणे आवश्यक आहे असे उद्गार ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले.मसापच्या कराड ग्रामीण शाखेच्यावतीने लक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविल्याबद्दल यशवंतराव चव्हाण यांनी लिहलेला ग्रंथ व रोप देवून मसाप कराड ग्रामीण शाखेचे अध्यक्ष गोरख तावरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी मसाप कराड ग्रामीण शाखेचे प्रमुख कार्यवाहक डॉ.बसवेश्वर चेणगे, सहकार्यवाहक शरद गाडे, खजिनदार मंगेश हिरवे, विश्वस्त सचिन देशमुख, उदय थोरात, सदस्य गजानन चेणगे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, समाजातील स्त्रीचा जननदर कमी होत चालला असून त्यांचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत.समलैंगिकता, बलात्कार अशा स्वरुपाची गुन्हेगार व अनैतिकतता वाढीस लागेल.त्यामुळे शासनस्तरावर याबाबत गार्ंभीयाने भूमिका घेणे गरजचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी मसाप कराड ग्रामीण शाखेच्या कामकाजाबाबत व उपक्रमांबाबत माहिती जाणुन घेतली.मसाप कराड ग्रामीणचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी शाखेच्या भविष्यकालिन योजनांबद्दल माहिती दिली.प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत प्रमुख कार्यवाह डॉ.बसवेश्वर चेणगे यांनी केले.शेवटी सहकार्यवाह शरद गाडे यांनी आभार मानेले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा