शतावधान जादूचा खेळ नव्हे तर आध्यात्म सिद्ध शक्ती - अभिनंदनचंद्र सागर

कराड (ललक्ष्मीपु) - जैन धर्मातील शतावधान हा जादूचा खेळ नसून आध्यात्म साधनेद्वारे कोणालाही सिद्ध करता येऊ शकले अशी सिद्धशक्ती आहे. ज्याठिकाणी साधनांद्वारे वैज्ञानिक सिद्धांत शक्ती निरस्त होते. त्याच ठिकाणी आध्यात्म साधनेतून सिद्ध शक्ती उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन युवा शतावधानी आचार्य नयनचंद्र सागरसूरीजी यांचे  शिष्य अभिनंदनचंद्र सागर यांनी केले. 

जैन समाज बांधवांच्या वतीने बाबुभाई पदमसी हॉलमध्ये आध्यात्म व ध्यान साधनेच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या अंशीक शक्ती या विषयी अभिनंदनचंद्र सागर यांचे मार्गदर्शनपर चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुळे बालमुनी नमीचंद्र सागर, नेमीचंद्र सागर उपस्थित होते. आजचे शतावधान मुनि सुपार्श्वचंद्र सागरजी यांनी केले.

अभिनंदनचंद्र म्हणाले, भारत देशाने संपूर्ण जगाला आध्यात्माची शिकवण दिली आहे. तप, त्याग व साधन यातून साधू संत आत्मिमक समाधान मिळवत असतात. यातून त्यांना आध्यात्मिक शक्ती मिळत असते. यातील अंशीक शतावधान हा एक प्रकार आहे. डॉक्टर, शास्त्रज्ञ यांचे या विषयाकडे आर्कषण असते. यावर अनेकजण संशोधन करून पीएचडी मिळवत आहेत. 

 जैन धर्मिय संस्थेचे विश्‍वस्त यावेळी उपस्थित होते. राजस्थानी जैन श्‍वेतांबर मूर्ती पूजक संघाचे अध्यक्ष कांतीलाल भंडारी, उपाध्यक्ष बाबुलाल लुनईया यांच्यासह कराड शहर व परिसरातील राजकीय, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश ओसवाल व मयूर गांधी यांनी केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.