यशवंतनगर ग्रामपंचायत निवडूक बिनविरोध युवा नेते जशराजबाबा पाटील यांनी केले अभिनंदन


    कराड (लक्ष्मीपुत्र) - यशवंतनगर, ता.कराड येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निडणूक बिनविरोध झाली असून,  जनतेतून थेट सरपंचपदासाठी तुळशीराम किसन चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवड झालेले सदस्यांमध्ये सौ.संजिवनी बाळासाो माळवे, सौ.विरश्री गणपती करांडे, अनिल दौलत यादव, रघुनाथ विष्णू येडगे, सौ.लीना निवासराव जाधव, हणमंत गोपाळ काळेबाग, सौ.अरूणा शशिकांत देशमुख, सौ.दीपाली पांडुरंग स्वामी, विकास रविंद्र चव्हाण, प्रकाश शिवाजीराव सोनवणे यांचा समावेश आहे.दरम्यान नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी युवा नेते जशराज पाटील बाबा यांची भेट घेतली, त्याप्रसंगी जशराज पाटील बाबा यांनी सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले.आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गर्शनाखाली यशवंत-नगर ग्रामपंचायतीच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या निवडीनंतर आमदार श्री बाळासाहेब पाटील यांनीही सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच, सर्व सदस्यांसह सह्याद्रि कारखान्याचे कामगार व कल्याण अधिकारी एन.आर.जाधव, विकास चव्हाण, विष्णू येडगे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.