काँग्रेसमुक्त भारत झालाच नाही, मात्र प्रियांका गांधी व राहुल गांधीचा करिष्मा दिसू लागला.
प्रियंका गांधी सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. नुकताच लखनऊ येथे त्यांचा रोड शो झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि प्रियांकाने लखनऊकरांना जिंकले असे म्हणता येईल. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नुकतीच प्रियंका गांधी यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर पहिल्यांदाच प्रियांका गांधी यांनी लखनऊ येथे उत्तर प्रदेशचा दौरा केला. यामध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो हिट ठरला आहे. प्रियांका गांधी यांचे पुनश्च राजकारणात झालेले आगमन हे सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी होऊ शकते. कारण प्रियांका गांधी यांचा चेहरा देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याशी साधर्म्य आहे. म्हणजेच प्रियांका गांधी या इंदिरा गांधी यांची नात आहे. हिंदुस्तान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा उल्लेख होतो. त्याचबरोबर देशाची खणकर महिला म्हणून इंदिरा गांधी यांच्याकडे पाहिले जात आहे.
इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि महिलाही देश चालवण्यामध्ये कोठे कमी नाहीत ! हे जगाला दाखवून दिलेले आहे. रोड शो करून जनतेमध्ये सामील होण्याची प्रथा देशांमध्ये नवीन नाही. मात्र रोडशो करीत असताना लोकांचा त्याला प्रतिसाद कसा मिळतोय ? हे महत्त्वाचे आहे. लखनऊमधील प्रियांका गांधी यांच्या रोड शोला अलोट गर्दी झाली होती आणि विविध प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. यामधील घोषणा सर्वाधिक वेधक होत्या. त्या प्रियांका गांधींचा जय जय कार करण्याबरोबरच सत्ताधारी पक्षावर खरपूस टीका करणाऱ्या ही घोषणा होत्या. यामुळे आगामी काळामध्ये प्रियांका गांधी यांची जादू व प्रियांका गांधी यांचा करिष्मा देशाला पहावयास मिळेल हे नक्की.प्रियांका गांधी राजकारणामध्ये सक्रिय झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी काम पाहत आहेत. राहुल गांधी देशभरामध्ये फिरून देशाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने, देशातील प्रश्नांची जाण विद्यमान सरकारला करून देण्याची संधी सोडत नाहीत.राहुल गांधी व प्रियांका गांधी हे आगामी लोकसभा निवडणुकीतील स्टार प्रचारक असून त्यांच्या भूमिका देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
सध्या केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. ते उलथवून टाकून काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी राहुल गांधी व प्रियांका गांधी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. गत काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले असे म्हणता येणार नाही. कारण सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला देशातील सर्व निवडणुकांमध्ये भरघोष यश मिळाले. मात्र नुकत्याच तीन राज्यातील झालेल्या निवडणुकीचा निकाल पाहता कॉंग्रेस पक्षाने या ठिकाणी आघाडी घेऊन सत्ता स्थापन केली आहे. यामुळे काँग्रेसमुक्त भारत झाला नाही. तर काँग्रेस पुन्हा सत्तेच्या जवळ पोहोचत आहे. असे वातावरण निर्माण होत आहे. गेल्या शंभर वर्षातील कॉंग्रेसचा इतिहास तपासला पाहिजे, काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान कोणीही नाकारू शकणार नाही, मात्र केवळ सत्तासंपादनासाठी काँग्रेसलाच टार्गेट करणे स्वाभाविक आहे. मात्र काँग्रेस पक्षाने देशासाठी काय केले ? असा प्रश्न वारंवार विचारून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही.गांधी घराण्याला देशाने स्वीकारले आहे. यामुळे गांधी घराण्याचा तिरस्कार करून, मत्सर करून, काही काळ सत्ता मिळवता येईल. पण ती दीर्घकाळ सत्ता टिकवता येणार नाही. हे सत्य स्वीकारावेच लागेल.
पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून त्यांनी देशासाठी काय केले ? असा प्रश्न विचारून अथवा त्यांचे चारित्र्यहनन करणे भारतीय संस्कृतीला शोभनीय नाही. काँग्रेसने गेल्या साठ-सत्तर वर्षामध्ये काय केले ? हे देशाने पाहिलेले आहे. वास्तविक पाहता काँग्रेसच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराची काही प्रकरणे झाली हे सत्य आहे. मात्र काँग्रेस पक्षाने देशाच्या विकासासाठी केलेले काम हे विसरता येणार नाही. कॉंग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा संभाळली आहे. तर त्यांच्या साथीला पक्षाचे सरचिटणीस म्हणून प्रियांका गांधी आता राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला अच्छे दिन नक्कीच येतील हे मात्र निश्चित. त्याचबरोबर काँग्रेसला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होईल आणि आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी करिष्मा केला तर केंद्रातील सत्ता हस्तगत करू शकतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
येणाऱ्या काळातील लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आजपर्यंत हिंदुस्थानमध्ये एका पक्षाची सत्ता दीर्घकाळ राहिलेली नाही. सत्तापरिवर्तन होत असते, मात्र सत्तेच्या मस्तीत मशगुल न होता, जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवून, सामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सत्तेचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांना वारंवार देशातील जनता काम करण्याची संधी देत असते. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आपली सत्ता कायम राखणार का ? काँग्रेस करिष्मा करून सत्ता संपादन करणार ! यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आणि जनता काय निर्णय घेणार ? हे ही पाहावे लागेल.
गोरख तावरे,
कराड.
9326711721




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा