वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना.... मोफत आरोग्य सुविधा
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे हिंदुस्तानला पडलेले सोनेरी स्वप्न आहे, असे म्हणावे लागेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्यातून जाऊन बराच कालावधी गेला मात्र, त्यांच्या स्मृती आजही जागृत ठेवल्या जात आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आहे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असणाऱ्या खात्यामध्ये शिवसेनाप्रमुखांच्या नावाने विविध योजना राबवल्या जात आहे. शिवसेनेची स्थापना सामाजिक कामासाठी झालेली आहे. शिवसेना ही राजकीय संघटना नसून सामाजिक संघटना आहे. शिवसेनेचे काम म्हणजे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण असे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेली देशातील मराठी माणसासाठी काम करणारी एकमेव शिवसेना संघटना आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा व भीती हिंदुस्तानमधील तमाम नागरिकांना होती. बाळासाहेब ठाकरे यांचा तस्पष्टवक्तेपणा सर्वांना भावला होता. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना राज्य शासनाच्यावतीने प्राथमिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, असा नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचा आग्रह होता.मराठी माणसावर जर कोणी अन्याय केला तर, त्याच्या कानाखाली आवाज काढावा असा शिवसैनिकांना आदेश दिलेला होता. अन्यायाविरुध्द चीड असणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या बद्दल प्रेम, जिव्हाळा होता. परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन मंत्री सातत्याने त्यांच्या खात्यामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनसामान्यांसाठी ज्या योजना राबवता येतील आणि जनतेला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सुविधा पुरवता येतील, याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. एसटी महामंडळाचा कारभार दिवाकर रावते यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अधिक गतिमान व पारदर्शक झाला आहे.
एसटी महामंडळमध्ये असणाऱ्या अनेक त्रुटी दिवाकर रावते यांनी दुरुस्त्या केलेल्या आहेत. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माफक दरामध्ये व सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी अनेक प्रकारचे आराखडे तयार करून त्याची अंमलबजावणी केलेली आहे. तर आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच नवीन एक उपक्रम राबवला असून त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे. राज्यात आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात येत असून केंद्र शासनाच्या माध्यमातून 100 युनिटला मंजुरी मिळालेले आहे आणि याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे. राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आलेले आहे आणि आयुष्यमान भारत अंतर्गत राज्यातील 151 आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे हे समाजातील गोरगरीब जनतेला राज्य शासनाच्यावतीने आरोग्य सेवा परिपूर्ण मिळावी, आरोग्य सेवेचा लाभ व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच परिपाक म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेची अंमलबजावणी होत आहे.
सध्या राज्यामध्ये खाजगी आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर यांनी अक्षरश लूट सुरू केली आहे. सामान्य जनतेला माफक दरामध्ये आरोग्य सुविधा मिळावी, असा हेतू सध्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टरांचा दिसून येत नाही. केवळ आपण वैद्यकीय पदवी घेत असताना झालेल्या खर्चाची अनेक पटीने वसुली करण्याचा उद्योग सध्या डॉक्टर मंडळी करतात, ही समाजाच्या दृष्टीने दुःखदायक बाब आहे. वास्तविक पाहता वैद्यकीय क्षेत्र म्हणजे समाजसेवा करण्याचे क्षेत्र आहे. मात्र सध्या वैद्यकीय क्षेत्र हे कत्तलखाना चालवल्याप्रमाणे दवाखाने चालवले जातात. सामान्य जनतेच्या जीवाचा अथवा सामान्य लोकांच्या आजाराचा सहानुभूतीने विचार करत नाहीत. त्यामुळेच राज्य शासनाला समाजातील गरीब जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करा विचार करावा लागतो, म्हणूनच आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आरोग्य योजना सुरू केलेली आहे.समाजातील शेवटच्या घटकाला सर्वाधिक सहानुभूतीचा आणि आधार कोण देणार ? असा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी राज्य शासनच ! कारण समाजातून निवडलेले लोकप्रतिनिधी हे नेहमीच समाजातील सर्व घटकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत असतात.
लोकप्रतिनिधींच्यामधून निवडणारे मंत्री देखील त्याच विचारसरणीचे असावे लागतात आणि शिवसेनेचे दोन मंत्री म्हणजेच दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे काम करत आहेत, याचा रास्त अभिमान शिवसैनिकांना आहे.राज्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून त्यामाध्यमातून झोपडपट्टीमधील नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता, औषोधोपचार, वैद्यकीय तपासण्या, तसेच मानसिक आरोग्य, माता व बाल आरोग्य संबंधीच्या अत्यंत महत्वाच्या 13 प्रकारच्या आरोग्यसुविधा मोफत मिळणार आहेत. यालाच म्हणतात शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण.
गोरख तावरे
9326711721

सहमत.
उत्तर द्याहटवा