नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत "ही तर श्रींची इच्छा"
मुलायमसिंग यादव यांनी संसदेमध्ये भाषण करताना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे मत व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंच झालेल्या आहेत. या विधानामुळे विरोधकांना धक्काच बसलेलाआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले काम व हिंदुस्थानचे जगभरामध्ये उंचावलेले नाव वाखाणण्याजोगे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गतकाळात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी यांनी जाहीरनाम्यातद्वारे ज्या घोषणा केल्या होत्या, त्या बहुतांश करून पूर्ण झाल्या आहे. यामुळेच कदाचित मुलायमसिंह यादव यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी मिळावी, असे म्हटलेले आहे. निर्णयक्षम असलेले, खंबीर नेतृत्व करणारे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाने अनुभवलेले आहेत.आजही हिंदुस्थानमधील जनतेच्या मनात नरेंद्र मोदी यांचे अढळ स्थान आहे.भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवडणूक मैदानात उतरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहेत.
देशामध्ये अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते आणि खंबीर नेतृत्वगुण असावे लागतात. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जनतेच्या पसंतीस उतरलेले आहेत. नरेंद्र मोदी यांचासारखा सर्वगुणसंपन्न पंतप्रधान देशाला मिळाला, हे देशाचे भाग्यच आहे.नरेंद्र मोदी हे हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदावर विराजमान होताना देशातील नागरिकांना नरेंद्र मोदी यांचा गर्वच झालेला होता. गतकाळातील पंतप्रधान फारसे बोलत नव्हते. मात्र देशाचा पंतप्रधान बोलका असू शकतो, हे नरेंद्र मोदी यांनी प्रथम देशाला दाखवून दिलेले आहे. भारतीय जनता पार्टीवर कमांड निर्माण करून नरेंद्र मोदी यांनी गतकाळच्या लोकसभा निवडणुका जिंकून स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. अनेक वर्षांपासून देशातील राजकारण अस्थिर होते, भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशाला स्थिर सरकार देण्याचा प्रथम प्रयत्न झालेला आहे. देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये स्थिर सरकारची मालिका चालू होती यामुळे देशाचे काय होणार ? हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता.
अशा बिकट परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाला आपण चांगले नेतृत्व देवू शकतो, हा आशावाद जनतेमध्ये निर्माण केला होता. देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्पष्ट बहुमत दिलेले होते. स्पष्ट बहुमताचे सरकार असल्याने गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य जनतेसाठी अनेक उपयुक्त योजना आणल्या आहेत. देशातील गोरगरीब, दीन - दलित यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी केलेली आहे. त्याचबरोबर जगभरामध्ये भारत हा महासत्ता देश आहे. हे बिंबविण्याचा प्रयत्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले असे म्हणता येईल. भारतीय जनता पार्टीचे सरकार गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. अनेक नवनवीन योजनांचा अवलंब करून सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ देशांच्या स्मृतीत राहील असा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे, हीच देशातील जनतेचीही इच्छा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नरेंद्र मोदी पुन्हा हिंदुस्थानचे पंतप्रधान व्हावेत "ही तर श्रींची इच्छा" असे म्हणावे लागेल. देशातील जनता म्हणजेच मतदार सुज्ञ आहेत. यामुळे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पुन्हा संधी मिळेल, असा आत्मविश्वास आहे. भारतीय जनता पार्टीला पुन्हा बहुमत मिळाले, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच संधी मिळणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. भारतीय जनता पार्टीने पुन्हा सत्ता मिळवायची असेल, तर आपल्या मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. गत लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत दिले आहे. असे पुन्हा होईल की नाही ? हे आताच सांगता येणार नाही. याचा विचार करून भारतीय जनता पार्टीने आपल्या सहयोगी मित्र पक्षांना सन्मानाने वागणूक दिली, तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार येवू शकते. असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. आणि देशातील जनतेचाही असाच मूड आहे. असे दिसून येत आहे.
गोरख तावरे, कराड
9326711721

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा