श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराडमध्ये होणार शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मान
देशाच्या संरक्षणामध्ये जवानांचे अनन्य साधारण महत्व आहे. मिलिटरीमध्ये काम करणारे जवान हे देशाच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या संरक्षणासाठी काम करीत असतात.अत्यंत कठिण परिस्थितीमध्ये व नैसर्गिक आपत्तींचा सामोरे जात आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्यात यासाठी जवान जिवाची बाजी लावून काम करतात. त्यामुळेच देशांमध्ये राहणारे नागरिक सुरक्षितपणे आपले जीवन कंठीत असतात.देशाच्या सीमा सुरक्षित असल्या आणि लगतच्या राष्ट्रांकडून देशावर हल्ले होणार नसतील तर देश सुरक्षित राहू शकतो. अन्यथा देशात लगत असणाऱ्या राष्ट्रांनी सीमेलगत काही हालचाली केल्या तर जवानांना त्याच पद्धतीने मुहतोड जवाब द्यावा लागतो. अन्यथा देशाचे संरक्षण धोक्यात येते. यामुळे जवान आपल्या जीवाची बाजी लावून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.
सीमा संरक्षण करत असताना अनेक जवानांना आपला जीव गमवावा लागतो. आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. सातारा जिल्हातील अनेक जवान सीमा संरक्षण दलांमध्ये काम करत आहेत. अनेक जवान देशाच्या संरक्षणासाठी कामी आलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील अपसिंगे व तळबीड येथील प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य मिलिटरीमध्ये सहभागी होऊन देशाच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. सातारा जिल्ह्याचा इतिहास देशासाठी बलिदान देण्यासाठी अग्रक्रमावर आहे. सातारा जिल्हा हा देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या नागरिकांचा आहे. यामुळे मिलिटरीमध्ये बहुसंख्य मराठा लाईफ बटालियनमध्ये बहुसंख्य युवक सहभागी होत असतात.देशावर प्रेम करणारे व देशासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक मिलिट्रीमध्ये काम करणारे युवक आत्तापर्यंत देशाच्या कामी आलेले आहेत. तळहातावर प्राण घेऊन देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी लढणारे मराठा युवकांना सलामच केला पाहिजे.
देशावर निस्सीम प्रेम करून केवळ आपले योगदान देणाऱ्या मराठी युवकांना सलामच केला पाहिजे.गतकाळामध्ये सातारा जिल्ह्यातील जे जवान देशाच्या कामी आले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना शासनाने मदत केली आहे मात्र, त्यांचा सन्मान सातारा जिल्ह्याच्यावतीने करण्यात यावा, यासाठी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मित्रमंडळाने यावेळी अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आगळावेगळा वाढदिवस सातारा जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे."शहीद जवान कृतज्ञता दिवस" म्हणून उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने कराड मध्ये साजरा होणार आहे. आणि हा उपक्रम कराड येथे होत आहे. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना "हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला" असे बोलले जाते या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकारांना दिली आहे. 24 फेब्रुवारी रोजी कृष्णा - कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसरांमध्ये शहीद वीर जवानांना आदरांजली वाहण्यात येणार आहे त्याचबरोबर जागो हिंदुस्तानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलामध्ये काम करणारे अनेक जवान आत्तापर्यंतचे धारातीर्थी पडलेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील 127 जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मान करण्याचे नियोजन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र मंडळाने करून आपले देशप्रेम प्रकट केलेले आहे. वाढदिवस केवळ विविध कार्यक्रमाने आयोजित करण्याऐवजी जे देशासाठी शहीद जवान झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा कौतुकास्पद कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज असणारे उदयनराजे भोसले यांच्याबद्दल युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. उदयनराजे महाराज यांनी यावेळी वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला घेतलेला आहे.
देशाच्या संरक्षणासाठी कामी येणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मान झाला पाहिजे, जवानांच्या कुटुंबियांना कोणत्याही हालअपेष्टांना सामोरे जाता कामा नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. दरम्यान त्याचबरोबर अशा कुटुंबीयांचा सन्मानही झाला पाहिजे, असा विचार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र मंडळाने केला, हा महत्त्वाचा विचार देशभरामध्ये राबवला गेला पाहिजे.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री असताना केलेले काम अनन्यसाधारण आहे. देशाला एक सक्षम संरक्षणमंत्री मिळाल्याची खात्री गतकाळामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण देशाला दिली होती. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना पाकिस्तान व चीन देशाबरोबर युद्ध झालेले आहेत. या युद्धामध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावून भारत सक्षम असल्याचे दाखवून दिलेले आहे. यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मित्र मंडळाने आयोजित केलेला कार्यक्रमाचा हेतू असा आहे की, सरक्षणमंत्री कार्यकाळामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कामाला पुन्हा एकदा उजाळा मिळावा, आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मान व्हावा, यासाठी कराडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
कराडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचा हेतू हा देशभरामध्ये जे जवान शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान व्हावा, इतकाच रास्त अपेक्षा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र मंडळाचा आहे.या कार्यक्रमाची देशभरातील देशप्रेमीनी दखल घेऊन आपल्या भागातील जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान केला पाहिजे.वीर जवानांच्याबद्दल देशप्रेमी नागरिकांच्या मनामध्ये प्रेम, जिव्हाळा आहे. मात्र शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून देशभरामध्ये जे जवान शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी स्फूर्ती मिळेल हे निश्चित.
छातीचा करून गडकोट,
तिरंग्यासाठी हसत हसत
कवटाळले तुम्ही मरण
वीरहो वचन तुम्हाला आमचे,
आम्ही रचनारच आतंक्याचे सरण
आणि म्हणूनच.... वीरस्मरण
गोरख तावरे,
कराड
93267117 21

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा