मृदू भाषिक डॉ. सुभाषराव एरम




डॉ. द. सि.एरम यांनी कराड शहराच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्याचबरोबर कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या उभारणीमध्ये डॉ. द. सि.एरम यांनी केलेले काम अतुलनीय आहे. कराड अर्बन बँकेमुळे कराडमधील अनेक व्यावसायिकांना अर्थसाहाय्य मिळाले त्याचबरोबर कराड अर्बन बँक केवळ कराड पुरतीच मर्यादित न राहता ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आहे. म्हणजेच कराड अर्बन बँकेने इतर जिल्ह्यांमध्ये आपल्या स्वतःच्या शाखा सुरू केल्या आहेत. विशेषता स्वमालकीच्या जागेमध्ये आहेत. पारदर्शक कारभार करण्याची परंपरा डॉ. द. सि. एरम यांनी कराड अर्बन बँकेला घालून दिले आहे. याच पायवाटेने आजही विद्यमान संचालक मंडळ कार्यरत आहे. यामुळे अर्बन बँकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक सुरू आहे. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्या कार्यकुशलतेबरोबरच आणि मार्गदर्शनामुळे कराड अर्बन बँक सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.आज अर्बन बँकेच्या ठेवीचा आकडा पाहिला तर डोळे दिपतील इतक्या मोठ्या प्रमाणात अर्बन बँकेकडे ठेवी जमा झालेल्या आहेत. त्याचबरोबर बँकेमध्ये जमा असणाऱ्या ठेवीमधूनच उद्योगसील तरुणांना कर्ज स्वरूपात मदत केली जात आहे. अनेक तरुण व्यावसायिक दृष्ट्या सक्षमपणे उभे राहिले आहेत. त्याला बहुतांश करून कराड अर्बन बँकेचा असणारा पाठिंबाच महत्त्वाचा आहे. कराड अर्बन बँकेचे चेअरमन म्हणून डॉ. सुभाषराव एरम सध्या कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून चेअरमनपदाची जबाबदारी सुभाषराव एरम समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. हे ही सर्वांनी प्रांजळपणे कबूल केलेले आहे. सुभाषराव एरम
यांनी दाखवलेल्या नेतृत्वगुणांची दखल घेतली पाहिजे. शांत, संयमी, मृदू भाषेत संभाषण करणारे व इतरांशी बोलणारे सुभाषराव एरम हे बँकेच्या कामकाजाबद्दल तितकेच अभ्यासपूर्ण बोलत असतात. आपल्या शारदा क्लिनिक हॉस्पिटलचा व्याप सांभाळून कराड अर्बन बँकेसाठी सुभाषराव एरम आपला अमूल्य वेळ देत असतात. गरजुवंत उद्योजकांना व युवा पिढीतील तरुणांना व्यवसायासाठी कराड अर्बन बँकेने कर्ज दिले पाहिजे,हा अट्टाहास डॉ. सुभाषराव एरम यांचा असतो. यामुळे अनेकांना सहज - सुलभ, उद्योग - व्यवसाय वाढीसाठी कराड अर्बन बँकेने कर्ज दिले आहे. कराड अर्बन बँकेची वाटचाल ही दमदार व पारदर्शकपणे सुरू आहे. याचे श्रेय अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व बँकेचे अध्यक्ष सुभाषराव एरम यांना निर्विवादपणे द्यावेच लागेल. सुभाषराव एरम यांचा वाढदिवसही अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जातो. मोठा गाजावाजा ते करीत नाहीत. कारण त्यांचा स्वभावच मुळात अतिशय शांत असल्याने कोणताही गाजावाजा न करता वाढदिवसा निमित्त येणाऱ्या स्वकीयांचा व मित्रपरिवार यांचा ते स्वीकार करीत असतात. "रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा" असे मानून डॉ. सुभाषराव एरम इमानेइतबारे रुग्णांची सेवा करीत असतात. डॉ. सुभाषराव एरम यांच्यासाठी आदर्शाची पायवाट घालून दिली आहे. ती म्हणजे डॉ. द. सि.. एरम उर्फ बाबा यांनी. म्हणूनच याची जाण व जाणीव ठेवूनच डॉ. सुभाषराव एरम समाजामध्ये वावरत असतात. आणि हे सद्गुन डॉ. सुभाषराव एरम त्यांच्या वागण्या - बोलण्यातून डॉ. द. सि. एरम उर्फ बाबांचा आदर्शवाद निदर्शनास येत आहे. गरीब, गरजू रुग्णांना शारदा क्लिनिकमध्ये उपचार केले जातात. उपचार घेणारे रुग्ण ही बरे होऊन समाधानाने व आनंदाने घरी जाताना डॉ. सुभाषराव एरम यांचा काही प्रसंगी पदस्पर्श करतात, आभार मानतात व कृतज्ञता व्यक्त करतात हे विशेष म्हणावे लागेल. कराड अर्बन बँकेचे चेअरमन व शारदा क्लिनिक हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुभाषराव एरम यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. . !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.