भाजपा विरुद्ध काँग्रेस उमेदवार एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून सज्ज / 6 अपक्ष नशीब आजमावताहेत / शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाणासह मैदानात
मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी या ठिकाणी सभा घेऊन निवडणुकीला रंगत आणली आहे.वास्तविक पाहता काँग्रेसकडून अद्याप प्रचार सभांचा धडाका दिसून येत नाही. वास्तविक पाहता प्रत्येक राजकीय पक्षाची प्रचार मोहीम व प्रचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असली तरी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचणे, मतदारांना आपली भूमिका पटवून सांगणे व लोकशाहीतील अमुल्य "मत" आपल्याच पक्षाला मिळवणे यासाठी प्रत्येकाने केलेल्या रचनेप्रमाणे मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रचार सभाचा शुभारंभ दोन्ही पक्षांनी केला आहे.
प्रचारसभा शुभारंभमध्ये वास्तविक पाहता याचवेळी एकमेकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. आता त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम सुरू आहे. वास्तविक पाहता केलेल्या आरोपांचे खंडन करायचे का ? केलेल्या विकास कामांबाबत बोलायचे ? असा विचार होताना मलकापूरमध्ये दिसतो आहे. मलकापूर नगरपालिका नव्याने स्थापन झाल्यामुळे, आता नवीन येणारे नगरसेवक व नगराध्यक्ष हे पहिल्यांदाच नगरपालिकेचे नगरसेवक व नगराध्यक्ष होणार आहेत. नऊ प्रभागांमध्ये काँग्रेस व भारतीय जनता पार्टीमध्ये अटीतटीची लढत होणार ! हे निश्चित झालेले आहे. त्यामुळे जागते रहो ! चा पहारा देवून प्रत्येक उमेदवार दक्ष आहेत. एकूण 19 नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडायचा आहे. अधिकृत पक्षाच्या चिन्हावर 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सहा उमेदवार अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाणाचा चिन्हावर निवडणूक मैदानात उतरलेले आहेत.
राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचेसंबंध तणावाचे वाटत असले तरी, स्थानिक पातळीवर मात्र आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून एकत्रित निवडणुका लढवण्याची मानसिकता दिसून येत आहे. मलकापूर नगरपालिका नव्याने निर्मित झाली असली तरी पहिल्यांदाच नागरिकांच्यातून नगराध्यक्षांची निवड होणार आहे. कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये गतकाळामध्ये भारतीय जनता पार्टीने करिश्मा दाखवून नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणलेला आहे. असाच करिष्मा मलकापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये करण्याचा मनोदय डॉ अतुल भोसले यांनी व्यक्त केलेला आहे. यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये जरी अटीतटीची निवडणूक होणार असले तरी प्रत्येक प्रभागांमध्ये असणाऱ्या उमेदवारांनी केलेल्या कामाची पोचपावतीच मतदार देणार आहेत.
मलकापूर निवडणुकीची पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस विरोधात भारतीय जनता पार्टी एकमेकाविरोधात दंड थोपटून उभे आहेत असे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असा आहे. तसेच जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने नीलम धनंजय येडगे आणि भारतीय जनता पार्टीच्यावतीने डॉ. सारिका प्रशांत गावडे आपले नशीब आजमावत आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
काँग्रेसच्यावतीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक मैदानात उतरले आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्यावतीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा मनोहर शिंदे यांनी उचलली आहे. तर काँग्रेसचे प्रचारप्रमुख म्हणून मनोहर शिंदे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी अतुल भोसले व अशोकराव थोरात प्रयत्न करीत आहेत. ९ प्रभागांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपामध्ये सरळ लढत होत असली तरी सहा अपक्ष आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे सातारा जिल्हा उपप्रमुख नितीन काशीद शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी सहकार्य करीत आहे. कारण प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार दिलेला नाही. तर शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत या प्रभागांमध्ये होत आहे.
मलकापूर पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९ प्रभागातून १९ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. एक ते आठ प्रभागांमध्ये दोन उमेदवार व ९ नंबर प्रभागांमध्ये तीन उमेदवार निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक १ अ, सर्वसाधारण महिला - गीतांजली शहाजी पाटील (काँग्रेस), मनीषा मच्छिंद्रनाथ शिंदे (भाजपा), प्रभाग क्रमांक१ ब, सर्वसाधारण पुरुष - नारायण उर्फ नितीन विष्णुपंत काशीद (शिवसेना), प्रशांत शिवाजी चांदे (काँग्रेस),
प्रभाग क्रमांक २अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - नाझिया समीर मुल्ला (काँग्रेस), नूरजहान राजू मुल्ला (भाजपा), प्रभाग क्रमांक २ ब, सर्वसाधारण पुरुष - विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश (भाजपा) मोहन सकाराम शिंगाडे (काँग्रेस),
प्रभाग क्रमांक ३ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग - किशोर कृष्ण शेडगे (काँग्रेस), मनोज ज्ञानदेव शेडगे (भाजपा), प्रभाग क्रमांक ३ ब, सर्वसाधारण महिला - आनंदी मोहन शिंदे (काँग्रेस), उमा प्रमोद शिंदे (भाजपा)
प्रभाग क्रमांक ४ अ, सर्वसाधारण महिला - अवंती रामचंद्र घाडगे (भाजपा), भारती दिलीप पाटील (काँग्रेस) प्रभाग क्रमांक ४ ब, सर्वसाधारण - सुहास राजाराम कदम (भाजपा) राजेंद्र प्रसाद यादव (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ५ अ, अनुसूचित जाती - मनीषा विलास चव्हाण (काँग्रेस), पद्माकर दिनकर जाधव (अपक्ष) मुकुंद निवृत्ती माने (अपक्ष), भास्कर उर्फ सुबराव सोळवंडे (भाजपा) प्रभाग क्रमांक ५ ब, सर्वसाधारण महिला - कमल आनंदराव कुराडे (काँग्रेस) सुशीला वसंत बागल (अपक्ष) शोभा रमेश यादव (भाजपा) ज्ञानेश्वरी दादासो शिंदे (अपक्ष),
प्रभाग क्रमांक ६ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग - दिनेश दीपक नार्वेकर (भाजपा), पूजा गणेश चव्हाण (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ६ ब, सर्वसाधारण महिला - पुनम कुशल जाधव (भाजपा) शकुंतला विठ्ठल शिगण (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ७ अ, अनुसूचित जाती महिला - प्रज्ञा विनायक दरागडे (भाजपा), स्वाती समीर तुपे (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ७ ब, सर्वसाधारण - हनुमंत निवृत्ती जाधव (भाजपा) दत्ता सिताराम पवार(काँग्रेस) सविनय शामकांत कांबळे (अपक्ष) सागर वसंतराव निकम (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ८ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - निर्मला आण्णासो काशीद (भाजपा), सुनिता अजित माळी (काँग्रेस) प्रभाग क्रमांक ८ ब, सर्वसाधारण - अजित ज्योतीराम थोरात (भाजपा) योगेश वसंतराव शिंदे (काँग्रेस) सूर्यकांत लक्ष्मण खोत (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ९ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - अश्विनी संतोष हिंगसे (भाजपा), नंदा संजय भोसले (काँग्रेस) प्रभाग क्रमांक ९ ब, सर्वसाधारण महिला - स्वाती संदीप पवार (भाजपा) अलका अशोक जगदाळे (काँग्रेस) प्रभाग क्रमांक ९ क, सर्वसाधारण मनोहर भास्करराव शिंदे (काँग्रेस) शामराव खंडेराव शिंदे (भाजपा)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा