नूरजहॉ मुल्ला यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद /प्रभाग 2 मधील दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील - राजू मुल्ला/ भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. सारिका गावडे यांना जनसेवेची संधी मिळेल !


मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला) मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून नूरजहॉ राजू मुल्ला या कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग २ मधून नूरजहॉ मुल्ला यांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे मी व माझे सहकारी प्रभाग २ मधून विक्रम अशोक चव्हाण आम्ही दोघे या प्रभागातून निवडून येणार असा विश्वास नूरजहॉ मुल्ला यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे. मलकापूरच्या इतिहासातील विशेष घटना म्हणजे 52 वर्षांमध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला तो नूरजहान मुल्ला यांना.

मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट जनतेमधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या डॉ. सारिका प्रशांत गावडे या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया नूरजहॉ मुल्ला व राजू मुल्ला यांनी व्यक्त केले आहे. मलकापूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांना जनसेवेची संधी देतील असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधून नूरजहॉ मुल्ला प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्याआहेत. प्रभाग क्रमांक २ चे एकूण मतदार संख्या 1300 अशी आहे. विशेष म्हणजे नूरजहॉ मुल्ला यांचे एमए पर्यंतचे शिक्षण झाले आहे. नूरजहॉ मुल्ला या शिक्षित व सुशिक्षित असून यापूर्वी त्यांनी मलकापूरमध्ये विकासाचे काम केले आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये मतदार नक्कीच मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील असा विश्वासही नूरजहॉ मुल्ला यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर मलकापुर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व रस्ते डांबरीकरण करणे, भाजी मंडईचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, त्याचबरोबर 24 तास वीज, 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि प्रभागांमध्ये वाचनालय उपलब्ध करून देणार असून लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे मैदान व तरुणांसाठी व्यायाम शाळा उपलब्ध करून देण्याची हमी नूरजहॉ मुल्ला यांनी दिली आहे. तर मलकापूर शहरासाठी कॉटेज हॉस्पिटलची सोय उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. नामदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न करणार आहे. सार्वजनिक स्वच्छता ग्रह स्त्री व पुरुषांसाठी निर्माण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मलकापूर सोलर सिटी होताना प्रभाग क्रमांक 2 मध्ये पूर्ण सोलर सिटी करण्याबाबत मी प्रयत्न करणार आहे. समाजातील गरीब व गरजू मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहनात्मक कामे करण्याचे काम आम्ही करीत आहोत, यापुढेही ते तसेच सुरू राहील असेहि नूरजहॉ मुल्ला यांनी यावेळी सांगितले.

मलकापूर शहराच्या विकासासाठी पहिल्यांदा 2008 साली नूरजहॉ राज मुल्ला या प्रथम निवडून आल्या. निवडून आल्यानंतर पहिल्यांदा नूरजहॉ मुल्ला यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद मिळाले. साडेचार वर्षे या पदावर कार्यरत होत्या. महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भूषवत असताना नूरजहॉ मुल्ला यांच्या कार्यकाळामध्ये मलकापूरमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामुळे नूरजहॉ मुल्ला या समाजाप्रती करीत असलेल्या कामाची दखल मलकापूरवाशी यांनी घेतलेली आहे. समाजातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे, महिलांचे प्रश्न अग्रक्रमाने सुटले पाहिजेत, यासाठी नूरजहॉ मुल्ला या सातत्याने काम करीत आहेत. महिला व बालकल्याण समितीचे सभापती कार्यकाळामध्ये तर त्यांनी काम केलेच आहे. त्याचबरोबर इतरवेळी नूरजहॉ मुल्ला या समाजातील महिलांचे अधिकाधिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात.

मलकापूरचा इतिहास पाहता मलकापूर ग्रामपंचायत, मलकापूर नगरपंचायत व सध्या होऊ घातलेले मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नूरजहॉ मुल्ला प्रभाग क्रमांक २ मधून मतदारांसमोर प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत. मुस्लिम समाजाच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून नूरजहॉ मुल्ला यांना मान मिळालेला आहे. नगराध्यक्ष नूरजहॉ मुल्ला असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. महिला व बालकल्याण समितीचे सभापती म्हणून प्रभावीपणे काम करताना विषेशत कन्या रत्न योजना, मुलींना बस सेवा मोफत पास, गरोदर माता पोषक आहार, मोफत लस, प्लास्टिक बंदी सारखे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली गेली.फक्त मुलींसाठी एसटी बस सेवा ही मलकापूरमधून सुरू करण्यात आलेली आहे.मलकापूर शहरातून मुली महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यानगरीत जातात, त्या मुलींना मोफत पास देण्याची सुविधा नूरजहॉ मुल्ला यांच्याच कार्यकाळामध्ये करण्यात आलेले आहे. कन्या रत्न योजना प्रभावीपणे राबवून मलकापूरचा अग्रक्रमांक राहावा यासाठी तत्कालीन बालकल्याण समितीचे सभापती म्हणून मोर्चा मुल्ला यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

मलकापूरमधील गरोदर मातांना पोषक आहार मिळावा यासाठी मलकापूर नगरपरिषदेने प्रयत्न केला. यावेळी महिला व बालकल्याण समितीचे सभापती या नूरजहॉ मुल्ला होत्या, एक महिला दुसऱ्या महिलेचे प्रश्न जाणू शकते, म्हणूनच गरोदर माता पोषक आहार योजना मलकापूरमध्ये यशस्वी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय झाला, याची अंमलबजावणी मलकापूरमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आले. प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवी वापरावी त्यासाठी चळवळ व प्रबोधन करण्यात आले. यामध्ये नूरजहॉ मुल्ला यांचा अग्रक्रम होता. समाजाचे प्रबोधन करून प्लास्टिक मुक्त मलकापूर करण्यासाठी नूरजहॉ मुल्ला यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मलकापूरमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनी, एखाद्या महिलेला मुलगी (अपत्य) झाल्यानंतर तिच्या सक्षम वाढीसाठी कन्या रत्न योजना आणि मलकापूरमधील महिला गरोदर असताना त्यांच्यासाठी गरोदर मातांना पोषक आहार मिळावा, यासाठी नूरजहॉ मुल्ला यांनी उल्लेखनीय व कौतुकास्पद काम केलेले आहे. हे मलकापूरवासियांना काम नजरेआड करून चालणार नाही.

दरम्यान महिला व बालकल्याण समितीचे सभापती कार्यकाळामध्ये नूरजहॉ मुल्ला यांनी केलेले काम पाहता आणि त्यांना नगराध्यक्षपदाची मिळालेली संधी यामुळे नूरजहॉ मुल्ला यांचे व्यक्तिमत्व सुशील, समाज उपयोगी, समाजाप्रती जिव्हाळा, प्रेम असणारे आहे, हे निदर्शनास आले आहे. मलकापूरचा विकास व्हायचा असेल तर अंडरग्राउंड ड्रेनेज झाले पाहिजे, यासाठी नूरजहॉ मुल्ला यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये मलकापूरमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम पूर्ण झालेले आहे. अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम सुस्थितीत व दर्जेदार झाले पाहिजे, आणि वेळेत काम पूर्ण करण्याकरिता नूरजहॉ मुल्ला यांनी परिश्रम घेतलेले आहेत. झाडे लावा झाडे जगवा, हा उपक्रमही मलकापूरमध्ये राबवला गेला यावेळी नूरजहॉ मुल्ला नगराध्यक्ष होत्या, मलकापूर शहर हरित झाले पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आलेले आहे. मलकापूर शहरांमध्ये कुपोषित बालकांना आहार मिळावा यासाठी कुपोषित बालकांसाठी पोषण आहार यासारखे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

सुलतान फकीर
संपादक दैनिक लक्ष्मीपुत्र
कराड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.