नूरजहाँ मुल्ला व दिनेश रैनाक प्रचंड मताधिक्याने विजय होणार तर नगराध्यक्ष म्हणून भाजपाच्या डॉ. सारिका गावडे यांना संधी मिळणार - राजू मुल्ला
मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग २ अ मधून नूरजहाँ राजू मुल्ला व प्रभाग २ ब मधून विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश रैनाक यांना मतदारांनी प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन ओबीसी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू मुल्ला यांनी केले आहे.मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट जनतेमधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या डॉ. सारिका प्रशांत गावडे या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया राजू मुल्ला यांनी व्यक्त केले आहे. मलकापूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांना जनसेवेची संधी देतील असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
मलकापूर शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक म्हणून नावलौकिक असलेले राजू मुल्ला यांच्या पत्नी नूरजहाँ मुल्ला या सध्या पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवीत आहेत. पारदर्शकतेने व्यवसाय करून मलकापूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे हे दाम्पत्य कौतुकास पात्र आहे. गरीब गरजू लोकांना नेहमी मदतीचा हात देणारे व अनेकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राजू मुल्ला यांच्याकडे पाहिले जात आहे. राजू मुल्ला हे व्यवसायात पारंगत असल्याने राजकारणात आपल्या धर्मपत्नीला म्हणजेच नूरजहाँ मुल्ला यांना संधी देणारे सुधारणावादी विचाराच पुरस्कर्ते म्हणून राजू मुल्ला यांच्याकडे पाहिले जात आहे.
प्रभाग २ अ मधून नूरजहाँ राजू मुल्ला व प्रभाग २ ब मधून विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश रैनाक निवडणूक लढवीत आहेत. दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राजू मुल्ला कसोशीचा प्रयत्न करीत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेणे, मतदारांना आपली भूमिका समजावून सांगणे, दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे यासाठी मतदारांना आवाहन करीत आहेत. राजू मुल्ला हे समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी ते सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करतात. त्याच बरोबर धार्मिक कामांमध्ये 365 दिवस आणि 24 तास ते उपलब्ध असतात. राजू मुल्ला हे गेल्या 15 वर्षांपासून ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत त्याचबरोबर यशवंतराव बांधकाम संघटनेचे अध्यक्ष आहेत.
राजू मुल्ला यांच्या घराण्याला सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची परंपरा आहे कारण राजू मुल्ला यांचे वडील सामाजिक कार्यात अग्रस्थानी होते तर राजू मुल्ला यांच्या काकी (चाची) मलकापूर ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. तर राजू मुल्ला यांच्या धर्मपत्नी नूरजहाँ मुल्ला या मलकापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष आहेत. 2002 साली शिवाजी स्टेडियमजवळ असणाऱ्या झोपडपट्टीला आग लागून झोपडपट्टी भस्मसात झाली होती. यावेळी संघटनेच्या मार्फत राजू मुल्ला यांनी झोपडपट्टीधारकांचे जे नुकसान झाले होते. त्या लोकांना आर्थिक मदत केली होती. यामध्ये अन्नधान्य वाटप, संसारोपयोगी साहित्य आणि महिलांना साडी, शाल वाटप करण्यात आले होते. त्याचबरोबर ओबीसी संघटनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना ओबीसी दाखला मोफत देण्याचे काम ते गेले दहा वर्षे सातत्याने करीत आहेत.
सुलतान फकीर
संपादक दैनिक लक्ष्मीपुत्र
कराड

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा