श्यामराव खंडेराव शिंदे उर्फ अण्णा यांचा विजय निश्‍चित होणार ! शामराव शिंदे उर्फ अण्णा यांनी घेतली प्रचारात आघाडी



मलकापुर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग 9 मधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणारे शामराव खंडेराव शिंदे उर्फ अण्णा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रत्यक्ष मतदारांना भेटून माझी उमेदवारी कशासाठी, हे पटवून दिले आहे. त्याचबरोबर श्यामराव खंडेराव शिंदे उर्फ अण्णा हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना प्रभाग ९ मधून वाढता पाठिंबा मिळत आहे. दरम्यान माझ्यासह सहयोगी उमेदवारांचा प्रचंड मतांनी विजय होईल असा विश्वास शामराव खंडेराव शिंदे उर्फ अण्णा यांनी व्यक्त केला आहे.

मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार शामराव खंडेराव शिंदे, स्वाती संदीप पवार, अश्विनी संतोष हिंगसे यांनी आघाडी घेतली असून प्रभाग 9 मधून आमचा विजय निश्चित होणार असा विश्वास शामराव खंडेराव शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मलकापूर शिंदे यांचे गाव म्हणून सुपरिचित आहे. त्याचबरोबर शामराव खंडेराव शिंदे हे राजकारण-समाजकारणात आघाडीवर असतात. समाजातील विविध घटकातील लोकांच्या सुखदुःखात शामराव अण्णा नेहमी सहभागी असतात. गोकाक सहकारी पाणीपुरवठा संस्थेमध्ये शामरावअण्णा अनेक वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर प्रगतिशील शेतकरी म्हणून शामराव खंडेराव शिंदे यांचे काम कौतुकास्पद असेच आहे. कराड विकास सोसायटीचे शामराव खंडेराव शिंदे यांनी अनेक वर्ष संचालक म्हणून काम करीत होते. तर यशवंत गृहनिर्माण सोसायटीचे शामराव खंडेराव शिंदे यांनी अनेक वर्ष चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. तसेच सध्या विद्यमान संचालक म्हणून शामराव अण्णा काम करीत आहेत. मलकापूरच्या विकासामध्ये त्यांचे योगदान आहे.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रभाग 9 मधून शामराव खंडेराव शिंदे हे निवडणूक मैदानात उतरले आहेत. भारतीय जनता पार्टीने मलकापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्याचा विडाच उचलला आहे. यामुळे शामराव खंडेराव शिंदे यांच्यासह स्वाती संदीप पवार, अश्विनी संतोष हिंगसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी एक ते नऊ प्रभागांमध्ये प्रचार करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कसोशीचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर प्रभाग 9 मध्ये प्रचार फेरी, मतदारांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारांनी निवडून येण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहे. यामुळे आमचा विजय निश्चित होणार असा आत्मविश्वास शामराव खंडेराव शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सारिका प्रशांत गावडे यांनी प्रभाग 9 मध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत. शामराव खंडेराव शिंदे यांनी आत्तापर्यंत मलकापूरच्या विकासामध्ये भाग घेतला असून मलकापूरच्या स्थित्यंतरांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. प्रभाग 9 मधील भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार शामराव खंडेराव शिंदे, स्वाती संदीप पवार, अश्विनी संतोष हिंगसे यांना कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन डॉ. सयाजी शिंदे यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.