*आमदार बाळासाहेब पाटील यांची पाल येथे उद्या सोमवार दि.7 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 4.30 वाजता होणार प्रचार शुभारंभाची जाहीर सभा*

कराड (लक्ष्मीपुत्र) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, आरपीआय (गवई व कवाडे गट) शे.का.प., स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार  आमदार शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील यांच्या प्रचार शुभारंभाची सभा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पाल (ता. कराड) या ठिकाणी सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर,  2019 रोजी दुपारी 4:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या प्रचार शुभारंभाच्या सभेस सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, माजी खासदार आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्रीनिवासजी पाटील, मा.आमदार श्री बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.श्री सुनील माने यांच्यासह सातारा जिल्हापरिषदेचे आजी माजी सदस्य, कराड उत्तरमध्ये समाविष्ट असलेल्या कराड, कोरेगाव, खटाव व सातारा पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तरी या प्रचार शुभारंभाच्या सभेसाठी कराड उत्तर मधील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री देवराज पाटील (दादा) यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.