पांडुरंगाचा कोप सोसणार नाही, सगळी मस्ती एकाच वेळी व्याजासह आम्ही परतफेड करणार - डॉ.अतुलबाबा भोसले


कराड (सुलतान फकिर) - चोवीस तारखेला एकादशी आहे.याचदिवशी विधानसभेचा निकाल आहे, हा निकाल अनपेक्षित लावल्याशिवाय राहणार नाही.विठ्ठलाचा अाशिर्वाद मिळाला, प्रामाणिकपणे काम केले, कोणताही स्वार्थ मनामध्ये ठेवला नाही.येणार्‍या काळामध्ये सत्त्तेची अपेक्षा नाही.निस्वार्थीपणे कराड दक्षिणच्या जनतेची सेवा करायची आहे.कोणीही, काहीही, कसेही बोर्ड लावले तरी चव्हाणसाहेबांचे नाव पुसू शकणार नाही.जे-जे लोक आमची चेष्टा करतात, आमची अवहेलना करतात, जे-जे लोकं पाडूरंगाच्या आबीराविषयी बोलतात, जे-जे लोकं गुलालाविषयी बोलतात त्यांची जेवढी 50 वर्षापासून मस्ती आहे तेवढी सगळी मस्ती एकाच वेळी व्याजासह आम्ही परतफेड करणार आहोत.त्यामुळे आता बोलताना विचार करा, जादा बोलू नका, देवाचे कोठे नाव काढू नका, पांडुरंगाचा कोप वाईट असतो, हे तुम्हला अजून माहिती नाही ते तुम्हाला सोसायचे नाही, आणि तुम्हाला सांभाळायला तुमचा नेता इथे थांबणार नाही असा इशार डॉ.अतुलबाबा भोसले यांनी विरोधकांना दिला.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ.अतुलबाबा भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला.यानंतर भव्य रॅलीव्दारे कन्याशाळासमोर येथे झालेल्या सभेमध्ये डॉ.अतुल भोसले बोलत होते.यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगावकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेशबाबा भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, मदनदादा मोहिते, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, शशिकांत हापसे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सुनिल पाटील, मानसिंग पाटील, अशोकराव थोरात, नगरसेवक विनायक पावस्कर, विद्या पावस्कर, अतुल शिंदे, सुहास जगताप, राजू मुल्ला, सारीका गावडे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, दादा देवकर, समाधान चव्हाण, किरण मुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होेते.

डॉ.अतुलबाबा भोसले म्हणाले, मतदार संघातील 32 हजार माता-भगिनींना उज्वला गॅस मोफत दिले.32 हजार घरांमध्ये आरोग्याची काळजी घेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी वेगळी योजना आणली, ज्या-ज्या ठिकाणी दुष्काळ असेल तेथे पिक संरक्षण विमा द्यायचे.राज्यामध्ये जलयुक्त शिवार सारखी एक महत्वपूर्ण योजना फडणवीस सरकारने आणली.या जलयुक्त शिवार योजनेमधून आपल्या मतदारसंघामध्ये अनेक गावांमध्ये मोठी कामे झाली.जलयुक्त शिवारची कामे केली आमच्या सरकारने आणि त्याचे उद्घाटन करण्याचे काम काही विद्यामान लोकांनी करायचा प्रयत्न केला. असा आरोप अतुल भोसले यांनी केला.

पाच वर्षामध्ये फडणवीस सरकारने मतदार संघामध्ये भरभरुन दिले आहे.कराड शहराला तीन वर्षामध्ये 45 कोटी केंद्र आणि राज्य सरकारने दिले.कराड शहराला या सरकारने काय दिले ? हे आम्ही लेखी पुराव्यानिशी देवू शकतो.कराड शहरामध्ये सर्व रस्ते काँं काँक्रिटीकरण करण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले आहे.मुख्यमंंत्री ग्रामसडक योजनेमधून कराड दक्षिण मतदारसंघामध्ये 16 कोटींची रस्ते केली आहेत.कराड शहराने व तालुक्याने जितके पैसे मागितले तेवढे पैसे भरभरुन देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या स्वप्नातील कराड शहर निर्माण करण्यासाठी जे-जे लागते ते-ते देण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे.येवढंच काय तर पांडूरंगाची सेवा करण्याचे जबाबदारीसुद्धा कराडकरांना दिली आहे. असे सांगुन अतुल भोसले म्हणाले, पंढरपूरच्या विठ्ठलाची सेवा करताना मनामध्ये कोणताही स्वार्थ न ठेवाता सेवा केली.आम्ही काम करत असताना माझी जी तुरुण पिढी आहे. त्याला स्वत:च्या पायावर कसे उभे करता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.

मुद्रा योजन ही शेतकर्‍यांच्या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आमच्या सरकारने आणली.कौशल्य विकास योजनेमधून 1200 युवकांपैकी 741 मुलांच्या हाताला काम हे आपण मेळाव्याच्या निमित्त्ताने दिले.इथे जमलेल्या माझ्या युवकांसह माता-भगिनींच्या आयुष्यामध्ये माझ्यामुळे काहीतरी बदल व्हावा, याच्यासाठी या मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी आहे. असे सांगुन अतुल भोसले म्हणाले, सर्व कारखान्यांनी उच्चांकी जो दर दिला आहे, तो आमच्या सरकारच्या काळामध्ये दिला.

आज बदलाच्या वातावरणामध्ये मतदार संघ आहे, लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे. या मतदार संघामध्ये बरेच दिवसांपासून चर्चा होती दुरंगी का तिरंगी लढत होणार, काही लोकं म्हणायचे काही लोकं वर निघालेत, काही लोकं म्हणायचे आम्हाला खाली संधी मिळते, वर गेला तरी काय उपयोग नाही आणि खाली राहिला तरी काय उपयोग नाही, लोकांनी आपला विचार पक्का केलेला आहे. मतदार संघाला पर्यटन करणारा आमदार आता आम्हाला नको, मतदारसंघातील सुख दु:खामध्ये मिसळणारा आमदार आम्हाला पाहिजे.आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोकं सामील झाली आहेत, अनेक लोक सामिल होणार आहेत, कोणीही मनामध्ये किंंतू परंतू ठेवू नका, व्हायचे तेच होणार आहे, दिवसेंदिवस आपला जनरेटा वाढत जाणार आहे.आणि या मतदार संघाला अभिप्रेत असणारा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.जो-जो कराड दक्षिणमधील मातब्बर नेता तो आपल्या बरोबर आहे.थोडीशी आपल्याला गरज होती ती नानांचा अाशिर्वाद मिळावा, तोही अाशिर्वाद आज आपल्याला मिळाला आहे असेही अतुलबाबा भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.

ना. शेखर चेरेगावकर म्हणाले, काँग्रेसमुक्त देश होत असताना कराडला ही संधी मिळाली आहे.सातारा जिल्ह्यातून व कराडमधून काँग्रेस हद्दपार करायची आहे.यशवंतराव चव्हाणांचे नाव घेवून राजकारण केले जाते. मात्र 10 वर्षात संरक्षण भिंत बांधता आली नाही, यामुळे पुराचा त्रास कराडकरांना झाला.तेव्हा सातारा जिल्ह्यातील आठ आमदार हे शिवसेना - भाजपासह महायुतीचे निवडून आणावयाचे आहेत.युतीचे सातारा जिल्ह्यात कोणीच नाही, हा कलंक खासदार व आमदारांना निवडून देवून पुसायचा आहे.

डॉ.सुरेशबाबा भोसले म्हणाले, गेल्या 5 वर्षापूर्वी अतुलचा निसटता पराभव झाला.परंतू पाच वर्षामध्ये अतुलने अनेक कामे केली आहेत.तेव्हा जनतेनेच गेल्या पाच वर्षामध्ये पृथ्वीराज चव्हाण का अतुल भोसलेंनी कामे केली याची तुलना करावी.पृथ्वीराज चव्हाण मुुख्यमंंत्री असताना जेवढा निधी आणला नाही, त्यापेक्षा ज्यादा निधी अतुलने आणला आहे.जे विद्यमान आमदार आहेत, त्यांना आता माजी आमदार करायचे आहे.25 वर्षे तुम्ही काही करु शकला नाही, हे दुदैव आहे.तुम्ही निवृत्त्त होत नाही, आता जनता निर्णय घेईल.तुमची राजकीय संध्याकाळ झाली आहे.अतुलला संधी द्या, तो नक्कीच मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलेल, असा विश्वासही डॉ.सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

मदनदादा मोहिते म्हणाले, तुम्ही माझ्यामुळे खासदार झाला हे सांगता मग आमदार कोणामुळे झालात ? हे का अजून सांगत नाही, असा सवाल उपस्थित करुन ते म्हणाले, तुम्हाला माणसे राखता येत नाहीत, राजकीय माणसांना हे कळते, तुम्हांला कसे कळत नाही ? मुख्यमंत्र्यांचे आमदार झालात.काँग्रेस त्यांच्याच गुणाने संपणार आहे.जिल्ह्याला अध्यक्ष नाही, कोणी घर देता का घर या नटसम्राट नाटकातील प्रसंगाप्रमाणे आजची काँंग्रेसची अवस्था आहे.गतकाळामध्ये अतुलचा पराभव आम्ही केला, आता आम्हीच अतुलला विजयी करणार असा विश्वासही मदनदादा मोहिते यांनी दिला.

यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, सुनिल पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, अशोकराव थोरात यांची समयोचित भाषणे झाली.शेवटी एकनाथ बागडी यांनी आभार मानले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.