सामान्यांच्या विकासासाठी आघाडीला विजयी करा आमदार बाळासाहेब पाटील यांचे आवाहन, पुण्यात उत्तरमधील मतदारांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात
कराड (लक्ष्मीपुत्र) - सध्याच्या सरकारने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले असून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. हे सरकार गोरगरिबांचे असल्याने सर्वसामान्यांच्या हितासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे सरकार विजयी करा, असे आवाहन माजी आमदार अण्णासाहेब बनसोडे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे कराड उत्तरवि धानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील व सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा पिंपरी-चिंचवड व सर्व पुणे परिसरातील ज्येष्ठ व युवक कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा श्री खंडोबा मंदिर सांस्कृतिक हॉल खंडोबा माळ, आकुर्डी (पुणे) येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, सर्वसामान्य जनतेसह नोकर वर्गाचे मोठे नुकसान या सरकारने केले आहे. अनेक मोठ्या कंपन्या बंद पडल्याने सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सत्तेत येणे महत्त्वाचे आहे, यासाठी कराड उत्तर मतदारसंघातील सर्व पुणे येथील रहिवाशांनी २१ तारखेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे.
याप्रसंगी माजी आमदार अण्णासाहेब बनसोडे, सुजित पाटील,
माजी नगरसेवक जितेंद्र पवार, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राजाराम सावंत, अशोक माने, श्रीकिरण देशमुख, श्रीमंतशेठ कदम, माणिकराव पाटील, पिराजी पवार, मच्छिंद्र कदम, संदीप पवार,चंद्रकांत दीक्षित, बजरंग पवार, दिगंबर डांगे, युवराज भोईट, दिलीप ढाणे, राजीव पिसाळ, प्रमोद चव्हाण, वसीम सुतार, मनोज साळुखे, हणमंत चव्हाण, विकास घोरपडे, निवास गोळे, प्रवीण यादव, महेश कदम, रमेश चव्हाण, रमेश पवार, रणजीत आवटे, सुभाष मुळे, जयवंत पवार, अशोक संकपाळ, सुनील जगदाळे, विठ्ठल भोपळे, विठ्ठल पोळ, अनिल माने, राजाराम सावंत, सिद्धनाथ चव्हाण आदींसह तरुण कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा