बच्चनप्रेमींनी अनुभवला महानायकाचा सुवर्णकाळ कराडात अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा; रसिकांना चित्रपटाची मेजवानी


कराड  (लक्ष्मीपुत्र) - 1970 ते 1980 चे दशक खर्‍या अर्थाने गाजले ते अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट सृष्टीतील धडाकेबाज एन्ट्रीने. एका सरस एक चित्रपट देऊन या महानायकाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तोच सुवर्णकाळ अभिताभ बच्चन यांच्या वाढदिनी कराडकरांनी पुन्हा अनुभवला. शंभर टक्के अमिताभ बच्चन प्रेमी गु्रप कराड- साताराच्या वतीने शुक्रवारी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त ‘सिलसिला’ या सुपरहीट चित्रपटाची मेजवानीही रसिकांना देण्यात आली. 

अमिताभ बच्चन प्रेमी गु्रपच्या वतीने बिग -बी अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोेबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त येथील प्रभात चित्रमंदिरात सिलसिला चित्रपट दाखविण्यात आला. हा शो अपेक्षेप्रमाणे ‘हाऊसफुल्ल’ झाला. हा चित्रपट पाहताना रसिक मंत्रमुग्ध होवून जुन्या आठवणीत हरवून गेले. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचा दैदीप्यमान सुवर्णकाळ त्यांनी पुन्हा नव्याने अनुभवला. मध्यंतराला केक कापून अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देण्यात आला. ‘आमचा श्वास आमचा ध्यास अमिताभ..अमिताभ’..च्या घोषवाक्याने चित्रपटगृह दणाणून गेले. बच्चन प्रेमी गु्रपच्या सदस्यांनी कुटुंबासमवेत चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. बच्चनप्रेमी नागरिकही यामध्ये सहभागी झाले होते. महिन्यातून एकदा या पध्दतीने अमिताभ यांचे चित्रपट लावण्यात यावेत अशी अपेक्षांही प्रेक्षकांनी व्यक्त केली. अमिताभ बच्चन प्रेमी गु्रपचे प्रमुख सतीश मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. 

अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने अनेक विधायक उपक्रम हाती घेतले आहेत. शहर स्वच्छता, नदीपात्राच्या स्वच्छता उपक्रमात पालिकेबरोबर या ग्रुपने सक्रीय सहभाग घेतला आहे. या शिवाय अमिताभ बच्चन यांच्या सिनेसृष्टीतील कार्याला उजाळा देताना त्यांचे चित्रपट, गाणी अशा संगितमय कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.