जातीयवादी संघटनांना थारा देऊ नका- आमदार बाळासाहेब पाटील
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कराड (लक्ष्मीपुत्र) - निवडणुका समोर आल्या की भावनिक बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा तसेच जाती-जातीत भांडणे लावून तेढ निर्माण करणाऱ्या संघटना पासून दूर रहावे असे आमदार बाळासाहेब पाटील लाडेगाव (ता.खटाव) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी बोलत होते
याप्रसंगी डॉ.भारत पाटणकर, समाजकल्याण सभापती शिवजीराव सर्वगोड, पांडुरंग चव्हाण, सुरेश पाटील, संतोष घार्गे, धनाजी पावशे, बापूसो माने, आनंदराव यादव, अनिल माने, दत्तात्रय रुद्रके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, मतदार संघची पुनर्रचना झाल्यापासून चार तालुक्यांचा या मतदार संघमध्ये समावेश झाला तरीही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता पूर्ण मतदार संघामध्ये समान न्यायाने निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कराड उत्तरची जनता ही सुज्ञ असून विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही जनता कधीही विसरणार नाही. जनतेने ठेवलेल्या विश्वासास पात्र राहून इथून पुढे देखील गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यशवंत विचार जपण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठाम उभे राहून आदरणीय शरद पवार साहेबांचे हात बळकट करा असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
शिवाजी अवघडे, बापूराव पिसाळ, आलम मुजावर, विलास शिंदे, राजेंद्र पिसाळ, उदय गुरव, सतीश शिंदे, अरुण देवडे, भानुदास जांभळे, कृष्णत यादव, शिवाजी यादव, कृष्णत हिंदुराव यादव, राम हरी पाटील, दिनकर शेठ, बापूराव पिसाळ, सावळा यादव, सुभाष यादव, उत्तम यादव, प्रमोद गुरव, शिवाजी यादव, नितीन भंडारी, शंकर यादव, गुलाब यादव, किसन पवार, किसन बाबुराव यादव, रामचंद्र पाटील, निखिल यादव, गणेश यादव, प्रथमेश यादव, लखन यादव, मनोज काशीद संकेत काटकर, सोमनाथ यादव, सुहास यादव तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा