सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढली - आमदार बाळासाहेब पाटील
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कराड (लक्ष्मीपुत्र) पाच वर्षांच्या युती सरकारच्या काळामध्ये केलेल्या नोटबंदी व जी एस टी यासारख्या हुकूमशाही पध्दतीतीच्या निर्णयामूळे बेरोजगारी वाढली असल्याचे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ टेंभू (ता.कराड) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.याप्रसंगी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार श्रीनीवास पाटील, गोपाळराव धोकटे, चंद्रकांत कदम, रामदास पवार, दादासो जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सेनेचे सरकार हे सातत्याने एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत होते परंतु निवडणुकीच्या तोंडावर सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र येऊन भावनिक प्रश्न निर्माण करून जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचं काम युती सारकांरने केले.त्यामुळे इथून पुढे शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जपण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, आदरणीय शरद पवारसाहेबांच्या नेतृवाखाली सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या उमेदवारांनी पक्ष का सोडला ? याच उत्तर सर्वसामान्य जनतेला द्यावे.जिल्ह्याच्या विकासासाठी पक्ष सोडल्याचे कारण सांगत आहेत तर मग गेल्या दहा वर्षात विकासकामसाठीचा निधी का माघारी घालवला असा टोला श्रीनिवास पाटील यांनी लगावला.
याप्रसंगी तुकाराम खोचरे, कुमार पवार, पै.सतीश डांगे, अधिक सुर्वे ,दिगंबर डांगे, हणमंत शेवाळे, शिवलिंग जंगम, चंद्रकांत भुसारी, बाबुवाहन पाटील, प्रताप सावंत, बाळासो पाटील, विनायक कदम, भीमराव पाटील, सयाजीराव पाटील, सुनील बाबर, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, भास्कर पाटील, मोहन बाबर, राहुल पाटील, राजाराम बाबर, सदाशिव इंगवले, सुरज मुल्ला, विक्रम कदम, अभिजीत महाडिक, पंकज पाटील, शेखर हुलवान, शुभम कांबळे तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा