विद्यमान आमदारांना निष्क्रिय म्हणणाऱ्यांनी आपली क्रियाशीलता सिद्ध करावी - अजितराव पाटील चिखलीकर

कराड (लक्ष्मीपुत्र) - आदरणीय स्व.यशवंतराव चव्हाणसाहेब आणि आदरणीय स्व.पी.डी.पाटील साहेब यांच्या विचारांचा वारसा जोपासून सह्याद्री सहकारी साखर कारखाना व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ सदस्य या नात्याने आमदार बाळासाहेब पाटील यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून कराड उत्तर विधानसभा मतदार संघ तळहातावरील फोडाप्रमाणे जपला असून मतदारसंघांमध्ये कोट्यवधींची विकासकामे केली आहेत त्यामधून लोकांची सामाजिक व आर्थिक प्रगती झाली आहे. असे असताना ज्यांना कोणताही जनाधार नाही ज्यांना कोणत्याही पक्ष्याविषयी निष्ठा नाही, पक्षाची ध्येय धोरणे नाहीत अशा आयाराम गयाराम उमेदवारांनी विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना निष्क्रिय आमदार असे म्हणणाऱ्यांनी आपली कशी प्रसिद्ध करावी असा टोला अजितराव पाटील चिखलीकर यांनी लगावला.

 चिखली (ता. कराड) येथील येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस,  राष्ट्रीय कॉंग्रेस  आणि मित्रपक्ष आघाडीचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य मानसिंगराव जगदाळे पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब चव्हाण नागझरी ची सरपंच जितेंद्र भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

अजित पाटील चिखलीकर पुढे म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीवेळी पक्ष बदलणाऱ्या उमेदवरांना कोणताही जनाधार नसून   आपली निष्क्रियता लपण्यासाठी विद्यमान आमदारांना म्हटले जात आहे.कराड उत्तरचे जनता हि सुज्ञ असून क्रियाशील कोण हे येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देईल.येणाऱ्या निवडणुकीला आघाडीच्या दोन्ही उमेदवरांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, मतदार संघ मोठा असला तरीही सामान न्यायाने निधी देण्याची भूमिका सातत्याने राहिली आहे.येणार शंभर टक्के निधी हा विकासकामांसाठी खर्च झाला असून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.निवडणूक जवळ आल्या की मोठं मोठ्या वल्गना करून  तरुणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने हे लोक करत आहेत.म्हणून यशवंत विचार जपण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहा असे आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

मानसिंगराव जगदाळे म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या परिसरामध्ये रानमाळावर शेती पिकत नव्हती परंतु काँग्रेस विचारसरणीने या भागांमध्ये जलसिंचनाच्या योजना आणल्या व शेतकरी शेती करू लागला व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले, तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाला योग्य भाव  देण्याचे काम आदरणीय पाटील साहेब करत होते व त्याचबरोबर आमदार बाळासाहेब पाटील करत आहेत.

 यावेळी बाळासाहेब जगदाळे, हेमंत जाधव, लहुराज जाधव, शिवाजी निकम, भीमराव माळी, पांडुरंग सावंत, बाळासाहेब पाटील, जयसिंगराव सावंत, रमेश गिरी, रामचंद्र, माळी,  सुदाम कांबळे, बबन सावंत, भीमराव क्षीरसागर, सरगर(सर), दिनकर सावंत, हरीबा चव्हाण, संजय माने, अशोक माने, आनंद सुळे, लक्ष्मण बुरुंगले, नाना गावडे, विठ्ठल मोरे, गनि मुल्ला, गजानन गिरी ,भगवान सावंत, माणिक माळी, अमीन मुलानी, महादेव जाधव तसेच इतर पदाधिकारी ग्रामस्थ व तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.