विरोधकांच्याच नाकर्तेपणामुळे चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळावर पुराचे पाणीआले - छ. उदयनराजे भोसले


 कराड (लक्ष्मीपुत्र) - सत्तेत असतानाही आणि विरोधात असतानाही मी नेहमी सामान्य जनतेच्या वेदना मांडण्याचे काम करत आलो आहे.विरोधक स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेतात. पण विरोधकांच्याच नाकर्तेपणामुळे चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळावर पुराचे पाणी आले. साधी पूरसंरक्षक भिंत बांधण्याचे काम त्यांना जमले नाही.मग उगाच कशाला नाटके करता?असा टोला भाजपा-शिवसेना महायुतीचे लोकसभेचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले लगावला.

 वारुंजी (ता.कराड) येथे प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, प्रतापसिंह पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन काशीद, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आप्पासो गायकवाड, दाजी जमाले, दिलीपराव चव्हाण, कृष्णा कारखान्याचे संचालक पैलवान शिवाजीराव जाधव, प्रमोद पाटील, विजय शिंदे,  स्वराज पाटील, हरिभाऊ पाटील, ॲड. विजय पाटील, पैलवान तुकाराम घोडके, अमित चव्हाण, सुनील काटकर, शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी शबाना मुल्ला उपस्थित होत्या.

 छ. उदयनराजे भोसले म्हणाले, काही लोकांनी यापूर्वी या समाधी स्थळावर आत्मक्लेश करण्याचे नाटक केले होते. खरंतर मी जेव्हा जेव्हा, जे जे प्रश्न उपस्थित केले आणि लोकांचं थोडं जरी ऐकून त्यावर आत्मचिंतन केले असते  तर आत्मक्लेश करायची वेळ आली नसती. ज्यांना मुख्यमंत्रीपद असताना सातारा जिल्हा सोडाच, साधा कराड तालुक्याचा विकास करणेही त्यांना जमले नाही.आमच्यासाठी केवळ तुम्ही मतदार नाही, तर तर तुमचे वैचारिक मत आमच्यासाठी महत्वाचे आहे तुम्हाला विश्वासात घेऊनच भविष्यात वाटचाल करणार आहे.आम्ही आता आरशातं बघणं सोडून दिलं आहे. आमचे विरोधक म्हणतात तरूणांना संधी द्यावी. आता हे स्वत:ला तरूण समजायला लागले तर मी आणि अतुलबाबा कोण आहोत? तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा मानत आम्ही आता आरसा बघायचे सोडून दिले आहे.

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, भाजपा सरकारने करा दक्षिणमध्ये भरघघेस निधी आणला. पण निधी कोण आणलाय हे न पाहताच भाजपा सरकारच्या कामाचे श्रेय घेत अनेकांनी भूमिपूजन केले.अशा श्रेय लाटणाऱ्या लोकांना त्यांची जागा येत्या निवडणुकीत मतदारांनी दाखवावी.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम खात्याअतंर्गत कोट्यवधींचा निधी कराड दक्षिणमध्ये आला आहे.येत्या काळातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच सत्तेवर येणार आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.छ. उदयनराजे भोसले हे लोककल्याणकारी भूमिका घेणारे हे खरेखुरे राजे आहेत.

दाजी जमाले म्हणाले, छत्रपती उदयनराजे चुकून चोराच्या आळंदीला गेले होते.  त्यांना ते समजल्यावर आता ते देवाच्या आळंदीला आलेत. या भागाला मोठी मदत अतुलबाबांनी आणली आहे. या दोन्ही उमेदवारांना वारुंजी गावातून मोठे मताधिक्य देणार

सुनील पाटील म्हणाले, अतुलबाबा व उदयनराजे यांना मताधिक्य देऊन विरोधकांना प्रत्युत्तर देणार. भाजपचे विचार घराघरात पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करणार असल्याचे यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.