मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये विकास केला - आ. बाळासाहेब पाटील


कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड उत्त्तर मतदार संघात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांचा विचार जोपासला आहे.मतदार संघात केलेल्या विकास कामांची पुस्तीका तयार केली आहे.आमदार म्हणून विरोधात असलो तरी लोकप्रतिनिधी या नात्याने निधी मिळवून मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये विकास केला आहे.याचा उल्लेख पुस्तीकेमध्ये केला असून आरोप करणार्‍यांनी निष्क्रीयतेची व्याख्या सांगावी असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी टीका करणार्‍यांना केले आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा पोटनिवडूकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, प्रकाश पवार उपस्थित होते. 

आमदार बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी, मंगळवार पेठेतील जोतिबाचे आणि आदरणीय स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.त्यानंतर त्यांचे कुंटूबियांनी औक्षण केले.मंगळवार पेठ, कराड येथील निवासस्थापासून, कृष्णा नाका सर्कलमार्गे स्टेशन रोड, दत्त चौकपासून तहसिलदार कार्यालयापर्यंत रॅलीव्दारे आमदार बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला.लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रिडांगणावर आयोजित सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा पोटनिवडूकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, बाळासाहेब सोळस्कर, चंद्रकांत जाधव, अ‍ॅड.लालासाहेब कोडे, डॉ.अशोक गुजर, मानसिंगराव जगदाळे, कांतीलाला पाटील, शहाजीराव शिरसागर, संभाजीराव गायकवाड, सुरेश पाटील, रविंद्र कदम, बबनराव कदम, संतोष घार्गे, माधवराव जाधव, सी.एम.पाटील, संपतराव पाटील, अशोकराव पाटील-पार्लेकर, दत्त्तात्रय रुद्रुके, सुहास बोराटे, अजितराव पाटील-चिखलीकर, संभाजी सुर्वे, अशोकराव पाटील, विनीता पलंगे, सुरेखा जाधव, संगिता साळुंखे, निलमताई पाटील, सुष्मा पलंगे, वनिता माने यांच्यासह आजी-माजी जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.

देशात पाच वर्षापूर्वी संकट आले, ते महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाच्या माध्यमातून आले.गेल्या पाच वर्षात जनतेला काय मिळाले असा प्रश्न करुन आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, जनतेला वाटले काहीतरी सरकार करेल पण जनतेला दिलासा देणारे पाच वर्षात काहीही झालेले नाही.विकासाबाबत महाराष्ट्र राज्य मागे गेले आहे.भावनेचे राजकारण केले जाते.370 कलम आणि महाराष्ट्राचा काय संबंध असाही प्रश्न उपस्थित करुन आ.बाळासाहेब पाटील म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीने गतकाळामध्ये चांगले काम केले आहे.तरीही काही सहकारी सोडून गेले.मतदार संघाचा विकास करायचा असे शिवसेना-भाजपात जाणारे सांगतात, तर मग गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही काय केले? आमदार म्हणून विरोधात असलो तरी लोकप्रतिनिधी या नात्याने निधी मिळवून मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये विकास केला आहे.याचा उल्लेख पुस्तीकेमध्ये केला असून आरोप करणार्‍यांनी निष्क्रीयतेची व्याख्या सांगावी असे आवाहन करत कराड उत्त्तर मतदार संघात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व आदरणीय स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांचा विचार जोपासला आहे.आदरणीय शरद पवारसाहेब यांना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळतोय.युवक शरद पवारसाहेबांच्या सोबत आहेत.ईडी तगादा मागे लावण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रवृत्त्तीपासून सावध राहिले पाहिजे.मतदार संघाच्या विकासासाठी आणि रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न सुरु असतो असेही शेवटी आमदार बाळासाहेब पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्व.यशवंतराव चव्हाण व स्व.पी.डी.पाटीलसाहेबांनी घालून दिलेली शिस्त अंगीकारली आहे.व त्यांच्याच पाऊलांवर वाटचाल सुरु आहे.सध्याच्या भाजप सरकाबद्दल लोकांच्रुा मनामध्ये संताप आहे. लोकांना गृहित धरले जाते.तुमच्या मताला काय किंंमत नाही, असे समजून लोकसभेची पोटनिवडणूक लादली आहे.कराडला लोकसभेची उमेदवारी मिळाली हा कराडचा राजकीय बहुमान आहे.हे आव्हान तुमच्या जोरावर स्विकारले आहे. मुख्यमंत्री असताना कराड उत्तारमध्ये अडीचशे कोटींची विकासकाम दिली.त्याचे श्रेय कोणे घेतले, नारळ कोणी फोडला, ते माहित नाही मात्र ही काम काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली आहेत.हे लक्षात ठेवावे.उत्त्तरेतील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेली असून आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.कराड दक्षिण व उत्त्तर मतदार संघाची काळजी करण्याचे कारण नाही.उत्त्तर मतदार संघामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना आघाडीची ताकत दिली जाईल.आमदार बाळासाहेब पाटील विजयी होतील असा विशवास व्यक्त करुन पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , श्रीनिवास पाटील हे पुन्हा सन्मानाने लोकसभेमध्ये जातील.सध्याचे सरकार जातीयवादी असून बहूजणांचे राज्य त्यांना संपवायचे आहे.महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायची ही ठरविणारी निवडणूक आहे असे  पृथ्वीराज चव्हाण आपल्या भाषणामध्ये म्हणाले.


सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, सतारा जिल्हा हा यशवंत विचाराचा जिल्हा आहे.शरद पवार हे यशवंतरावांचे माणसपूत्र आहेत.शरद पवारांच्या हाकेला सातारा जिल्हा मदत करेल असावा विश्वास व्यक्त करुन श्रीनिवास पाटील म्हणाले, दणका द्यायचा व दणकूण कसा आणायचा हे शरद पवारांना चांगले माहित आहे.

संजीव देशपांडे यांनी पी.डी.पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेवून आमदार बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी त्यांना पेढ्याचा घास भरविला.

आमदार बाळासाहेब पाटील अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह रॅलीव्दारे तहसिल कार्यालयामध्ये जात असताना दत्त्तचौकामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

सातारा लोकसभा पोटनिवडणूक जिंकणारच असा प्रभळ आत्मविश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.कराड उत्तर व कराड तालुक्याचे लिडच पोटनिवडणूकीच्या विजयासाठी उपयुक्त ठरेल.

सुमारे 20 ते 25 हजार जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे भरला कराड उत्त्तर विधानसभा मतदार संघातून अर्ज

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.