आमदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी अलोट गर्दी


कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांना सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य देवून निवड झाल्याबद्दल मतदारसंघातील प्रत्येक गावातील नागरिकांनी आमदार बाळासाहेब पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिपावली शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. शुभेच्छा देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती.

आमदार बाळासाहेब पाटील विधानसभा निवडणूकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल मतदार संघातील ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आमदार बाळासाहेब पाटील यांनी सर्वांचे नम्रतापूर्वक स्वागत करून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावतीने येणाऱ्या नागरिकांसाठी दिपावली फराळाचे आयोजन केले होते, याचा सर्वांनी आस्वाद घेतला.

मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करीत असल्यामुळे लोकांचे प्रचंड प्रेम आमच्यावर असल्याचे नमूद करून आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, सातत्याने मतदार मतदारसंघातील जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत असतो. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो याला नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात असेही आमदार बाळासाहेब पाटील प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.