सांगली येथे वीरशैव लिंगायत तेली समाज भव्य राज्यस्तरीय वधुवर व पालक परिचय स्नेहमेळावा


कराड (लक्ष्मीपुत्र) - सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत सांगली शहर तेली समाज सांगली यांचेवतीने भव्य राज्यस्तरीय वधुवर व पालक परिचय स्नेहमेळावा व सत्कार समारंभ रविवार दि. ३-११-२०१९ रोजी सकाळी ९ वाजलेपासून फल्ले मंगल कार्यालय, सांगली इस्लामपूर रोड, टोलनाक्याजवळ, सांगलीवाडी येथे आयोजित केला आहे असे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत गणपती फल्ले यांनी कळविले आहे.

महाराष्ट्रात मोठया प्रमाणात वीरशैव लिंगायत तेली समाज आहे. यंदा ज्यांना कर्तव्य आहे अशा तरूण-तरूणांनी त्यांचे घरातील आणि समाजातील जेष्ठांच्या आर्शिवादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा तसेच समाजाची प्रगती हेच आमचे ध्येय असल्याने समाजाचा विकासात्मक दृष्टीकोन विचारात घेवून समाजातील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मेळाव्याचा जास्तीत जास्त तरुण, तरूणींनी लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. श्री. सुधाकर बेंद्रे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र लोखंडे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप मुंढेकर तसेच कराड दक्षिणचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तारळेकर यांनी केलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.