पृथ्वीराज चव्हाणांनी कराडमध्ये कोणता रोजगार निर्माण केला ? गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सवाल

कराड  (लक्ष्मीपुत्र) - पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात काय कामे केली, यापेक्षा त्यांनी मतदारसंघात किती रोजगार निर्माण केला का ? युवकांच्या रोजगारासाठी काय प्रयत्न केले ? असा सवाल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा कॉफी विथ युथ कार्यक्रम वेणुताई चव्हाण सभागृहात पार पडला. भाजपा-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले, भाजपा-शिवसेना महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, बाळासाहेब यादव, भाजयुमो चे प्रदेश सचिव सुदर्शन पाटसकर,भाजपा उद्योजक आघाडीचे धनंजय खोत, राहुल यादव, भूषण जगताप, युवा मोर्चा मलकापूर शहराध्यक्ष तानाजी देशमुख, अनिकेत मोरे उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कराड दक्षिणमधील युवक-युवतींशी कॉफीचा आस्वाद घेत संवाद साधला.

डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण आता कराड दक्षिणमधील मतदारांना भावनिक आवाहन करीत आहेत, की ‘माझी ही शेवटची निवडूक असून, मी यापुढे रिटायर होणार आहे. मला शेवटशी संधी द्यावी. अशा रिटायर होणाऱ्या नेत्याला युवकांनी आत्ताच रिटायरमेंट देऊन घरी बसवावे. आणि तरूणाईचा विचार करणाऱ्या अतुलबाबांना निवडून द्यावे असे आवाहन करून डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गांधी घराण्यावर अवलंबून असणाऱ्या नेतृत्वाला आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे. केंद्रात भाजपाचे सरकार असून, राज्यातही पुन्हा भाजपाचेच सरकार येणार आहे. तरी युवकांनी परिवर्तनाच्या बाजून मतदान करावे.

देशाचे भविष्य युवकांच्या हातात असून, मतदान करताना युवकांनी देशहित डोळ्यासमोर ठेवावे. या देशात अनेक क्रांत्या युवकांनीच केल्या आहेत, आताही योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी युवकांनी निवडणुका हातात घेतल्या पाहिजेत. ते तुमचे कर्तव्यच आहे. असे सागुन छ. उदयनराजे भोसले म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण आपण 10 वर्षात काय काम केले ? तुमच्यासह कुटुंबातील सदस्यांनी विविध पदे भोगली, पण कराडच्या विकासासाठी तुमच्या कुटुंबाने नेमके कार्य केलेव ? गेल्या 35 वर्षात तुम्ही काही करू शकला नाही, तर तुम्ही आता काय करणार ? रडून मते मागायला येणाऱ्यांनी ऐन उमेदीच्या काळात काही केले नाही, ते आता काय करणार ? त्यामुळे या मतदारसंघातील जनतेने पृथ्वीराज चव्हाण यांना मते देऊन वाया घालवू नये असे आवाहन ही छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

कराड दक्षिण मतदारसंघातील युवकांसाठी नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर युवक - युवतींसाठी कौशल्य विकास केंद्रे उभारणीसाठी आगामी काळात प्रयत्न केला जाईल अशी हमी देवुन डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, यापूर्वी बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून त्यापैकी 751 जणांना एकाच दिवशी विविध कंपन्यांत नोकरी मिळवून दिली आहे.

युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. प्रमोद सावंत यांनी समर्पक उत्तरे दिली. विविध महाविद्यालयातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.