रौप्यमहोत्सवी आमदार बाळासाहेब पाटील यांचे आमदार विश्वजित कदम यांनी केले अभिनंदन
कराड (लक्ष्मीपुत्र)- कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने पाचव्यांदा विजय संपादन केलल्याबद्दल आमदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन आमदार विश्वजीत कदम यांनी केले. कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून रौप्यमहोत्सवी आमदारकी साजरी करणारे आमदार बाळासाहेब पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देवून लोकप्रतिनिधीत्व करणारे आमदार बाळासाहेब पाटील यांचे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.
कडेगाव पलूस मतदार संघातून काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम विजयी झाल्यानंतर ते प्रथमच कराड येथे आल्यानंतर त्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले. यानंतर स्व.पी.डी.पाटीलसाहेब यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कराडच्या प्रितीसंगमावरील स्व.यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधी स्थळी अभिवादन केले. यावेळी दिपक भोसले, शिवराज मोरे, माणिक पाटील, दिगंबर डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा