अतुल भोसलेंना आमदार करा राज्यस्तरावर संधी देतो - अमित शहा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कराड (लक्ष्मीपुत्र) - अतुल भोसले म्हणतात मी छोटा कार्यकर्त्या आहे.परंतू भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे.छोटे छोटे कार्यकर्त्येंच पक्षाला पुढे घेवून जात असून राष्ट्रवाद विचार धारेला पुढे नेहले जात आहे.मोदीपासून सर्वच कार्यकर्ते पोस्टर चिटकवून मोठे झाले आहेत. अतुलचा गेल्यावेळी विधानसभेला पराभव झाला असला तरी तुम्ही पुन्हा एकदा अतुलला मतदान करुन आमदार करा मी राज्यस्तरावर संधी देतो असे आश्वासन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.
भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या विचारांवर चालत आहे.छ.उदयनराजे भोसले व अतुल भोसले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन अमित शहा यांनी करुन पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पवित्र भूमीवर येवून मी रोमांंचित व आनंदीत झालो आहे.आम्ही ज्यांची प्रेरणा घेतो ती छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे.अशी भूमी जी भगव्या ध्वजाचा सन्मान केवळ महाराष्ट्रापुरताच नव्हे तर संपूर्ण देशभर पोहचविला.
सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली.सर्वाधिक पाऊस चेरापुंजीपेक्षा सातारा जिल्ह्यामध्ये झाला.सध्या निवडणूका सुरु असून निवडणूकीनंतर केंद्र सरकार पुरग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावेल अशी हमी देवून अमित शहा म्हणाले, या भागाच्या विकासासाठी भाजपाने भरपूर काम केले आहे.सातारा जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्र्र्रश्न गंंभीर आहे.पाच वर्षामध्ये सातारा जिल्ह्यातील 38 हजार हेक्टर जमिनीवरील पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडविला जाईल.70 हजार कोटी रुपये अजित पवारांनी सिंचनावर खर्च केला.पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांनी सांगावे सिंचनावर खर्च केला मग पाणी कोठे गेले? असा सवाल अमित शहा यांनी केला.
कृष्णा खोर्याची कामे गेल्या 15 वर्षामध्ये झाली नाहीत.शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा कृष्णा खोर्यांची कामे सुरु झाली.26 मोठ्या योजना असून त्याची कामे मार्गी लावली जातील.कृष्णा खोर्याच्या कामामध्ये काँग्रेसने भष्ट्राचार केला आणि सिंचनाची कामे अपुरी ठेवली.एक वेळ शिवसेना-भाजपला संधी द्या.कृष्णा खोर्याची सर्व कामे पूर्ण केली जातील. 10 वर्ष केंद्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्त्ता होती, त्यावेळी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करुन अमित शहा म्हणाले, जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मते मागायला आले की त्यांना विचारा तुम्ही प्रधानमंत्री कार्यालयाचे मंत्री होता तेव्हा महाराष्ट्राला काय दिले यांचा हिशेब घेवून या.आणि पृथ्वीराज चव्हाण हिशेब घेवून आले तर आमच्यातल्या कुठल्या मोठ्या नेत्यांची गरज नाही, माझ्या युवा मोर्चाचा कार्यकर्ताच तुम्हाला उत्त्तर द्यायला सक्षम आहे.
शरद पवारांना आव्हान देतो की, आमच्या मुख्यमंत्री आणि पतंप्रधानांवर तुम्ही एकही भष्ट्राचाराचा आरोप करु शकत नाही.कारण जलयुक्त शिवारांच्या माध्यमातून शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणी पोहचविले.आणि शरद पवार आम्हाला हिशेब मागतात.जर मी संपूर्ण हिशेब द्यायला लागलो तर एक दोन दिवस नाही तर सात दिवस लागतील असा टोला अमित शहा यांनी लगावून पुढे म्हणाले, शरद पवार मला वारंवार विचारतात 370 चा महाराष्ट्राचा काय संबंध, तर मला सांगा कराड-सातारामधील जनतेचे काश्मीरवर पे्र्रम आहे किंवा नाही असे विचारताच जनसमुदयांनी होकार हार्थी घोषणा दिल्या.आणि आम्हाला सांगतात 370 हटवून कोणते मोठे काम केले.तर मग तुम्ही का हे केेले नाही असा सवाल उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाण मते मागायला आली तर त्यांना विचरा 370 कटवण्याच्या बाजूला आहात का? विरोधी आहात.आमचे उदयनराजे या मुद्यावरच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले आहेत.
अतुलबाबा भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील बहुतांश युवक सैन्यदलामध्ये भरती झालेले आहेत.370 कलम हटविल्यामुळे या सैनिकांना दिलासा मिळाला आहे.देशाच्या सिमा सरंक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक जवानांनी बलिदान दिले आहे.370 कलम रद्द झाले आणि माजी मुख्यमंत्री म्हणाले हे चांगले झाले नाही.याबाबात आम्ही स्पष्टीकरण मागितले.ते आजपर्यंत त्यांनी दिले नाही.वाकुर्डेचे पाणी या भागाला मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव तात्काळ मंजूर केल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा फायदा झाला आहे.माजी मुख्यमंंत्र्यांना पाकिस्तानमध्ये जाणार्या पाण्याबद्दल काळजी आहे. मात्र मतदारसंघातल्या पाण्याबद्दल नाही असा टोला अतुलबाबा भोसले यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे.सातारा पोटनिवडणूकीत छ.उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची हमी अमित शहा यांना अतुल भोसले यांनी दिली.माजी मुख्यमंत्री मला म्हणतात लहान कार्यकर्ता आहेस.जरी मी लहान कार्यकर्ता असलो तरी, भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांचा मला अर्शिवाद आहे.हा सामान्य कार्यकर्त्यांच तुम्हाला भरी पडतोय असेही अतुलबाबा भोसले म्हणाले.
कराड येथील शिवाजी स्टेडियमवर महाजनादेश संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे उमेदवार छ.उदयनराजे भोसले, कराड दक्षिण मतदार संघाचे उमेदवार अतुलबाबा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, सहकार परिषदचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सांगलीच्या निती केळकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, मदनराव मोहिते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, भरत पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक विनायक पावस्कर, विद्या पावस्कर, अंजली कुंभार, कविता कचरे, मोहन जाधव, भाजपा शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुनिल पाटील उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या विचारांवर चालत आहे.छ.उदयनराजे भोसले व अतुल भोसले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन अमित शहा यांनी करुन पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पवित्र भूमीवर येवून मी रोमांंचित व आनंदीत झालो आहे.आम्ही ज्यांची प्रेरणा घेतो ती छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे.अशी भूमी जी भगव्या ध्वजाचा सन्मान केवळ महाराष्ट्रापुरताच नव्हे तर संपूर्ण देशभर पोहचविला.
सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली.सर्वाधिक पाऊस चेरापुंजीपेक्षा सातारा जिल्ह्यामध्ये झाला.सध्या निवडणूका सुरु असून निवडणूकीनंतर केंद्र सरकार पुरग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावेल अशी हमी देवून अमित शहा म्हणाले, या भागाच्या विकासासाठी भाजपाने भरपूर काम केले आहे.सातारा जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्र्र्रश्न गंंभीर आहे.पाच वर्षामध्ये सातारा जिल्ह्यातील 38 हजार हेक्टर जमिनीवरील पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडविला जाईल.70 हजार कोटी रुपये अजित पवारांनी सिंचनावर खर्च केला.पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांनी सांगावे सिंचनावर खर्च केला मग पाणी कोठे गेले? असा सवाल अमित शहा यांनी केला.
कृष्णा खोर्याची कामे गेल्या 15 वर्षामध्ये झाली नाहीत.शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा कृष्णा खोर्यांची कामे सुरु झाली.26 मोठ्या योजना असून त्याची कामे मार्गी लावली जातील.कृष्णा खोर्याच्या कामामध्ये काँग्रेसने भष्ट्राचार केला आणि सिंचनाची कामे अपुरी ठेवली.एक वेळ शिवसेना-भाजपला संधी द्या.कृष्णा खोर्याची सर्व कामे पूर्ण केली जातील. 10 वर्ष केंद्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्त्ता होती, त्यावेळी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करुन अमित शहा म्हणाले, जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मते मागायला आले की त्यांना विचारा तुम्ही प्रधानमंत्री कार्यालयाचे मंत्री होता तेव्हा महाराष्ट्राला काय दिले यांचा हिशेब घेवून या.आणि पृथ्वीराज चव्हाण हिशेब घेवून आले तर आमच्यातल्या कुठल्या मोठ्या नेत्यांची गरज नाही, माझ्या युवा मोर्चाचा कार्यकर्ताच तुम्हाला उत्त्तर द्यायला सक्षम आहे.
शरद पवारांना आव्हान देतो की, आमच्या मुख्यमंत्री आणि पतंप्रधानांवर तुम्ही एकही भष्ट्राचाराचा आरोप करु शकत नाही.कारण जलयुक्त शिवारांच्या माध्यमातून शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणी पोहचविले.आणि शरद पवार आम्हाला हिशेब मागतात.जर मी संपूर्ण हिशेब द्यायला लागलो तर एक दोन दिवस नाही तर सात दिवस लागतील असा टोला अमित शहा यांनी लगावून पुढे म्हणाले, शरद पवार मला वारंवार विचारतात 370 चा महाराष्ट्राचा काय संबंध, तर मला सांगा कराड-सातारामधील जनतेचे काश्मीरवर पे्र्रम आहे किंवा नाही असे विचारताच जनसमुदयांनी होकार हार्थी घोषणा दिल्या.आणि आम्हाला सांगतात 370 हटवून कोणते मोठे काम केले.तर मग तुम्ही का हे केेले नाही असा सवाल उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाण मते मागायला आली तर त्यांना विचरा 370 कटवण्याच्या बाजूला आहात का? विरोधी आहात.आमचे उदयनराजे या मुद्यावरच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले आहेत.
अतुलबाबा भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील बहुतांश युवक सैन्यदलामध्ये भरती झालेले आहेत.370 कलम हटविल्यामुळे या सैनिकांना दिलासा मिळाला आहे.देशाच्या सिमा सरंक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक जवानांनी बलिदान दिले आहे.370 कलम रद्द झाले आणि माजी मुख्यमंत्री म्हणाले हे चांगले झाले नाही.याबाबात आम्ही स्पष्टीकरण मागितले.ते आजपर्यंत त्यांनी दिले नाही.वाकुर्डेचे पाणी या भागाला मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव तात्काळ मंजूर केल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा फायदा झाला आहे.माजी मुख्यमंंत्र्यांना पाकिस्तानमध्ये जाणार्या पाण्याबद्दल काळजी आहे. मात्र मतदारसंघातल्या पाण्याबद्दल नाही असा टोला अतुलबाबा भोसले यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे.सातारा पोटनिवडणूकीत छ.उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची हमी अमित शहा यांना अतुल भोसले यांनी दिली.माजी मुख्यमंत्री मला म्हणतात लहान कार्यकर्ता आहेस.जरी मी लहान कार्यकर्ता असलो तरी, भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांचा मला अर्शिवाद आहे.हा सामान्य कार्यकर्त्यांच तुम्हाला भरी पडतोय असेही अतुलबाबा भोसले म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा