स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने पाटणमध्ये मुक आंदोलन     


        मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने सलून दुकाने चालू करण्यासाठी तसेच सलून व ब्युटी पार्लर कारागिरांना आर्थिक मदत, प्रत्येक सलून व ब्युटी पार्लर कारागिराला 50 लाखांचा आरोग्य मेडिकल इन्शुरन्स व सलून सुरू झाल्यावर सलून व ब्युटी पार्लर कारागिराचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला  20 लाखांची मदत मिळावी, भूमिहीन नाभिक बांधवांना शासकीय जमिनी मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाध्यक्ष आधिकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित व पाटण तालुका अध्यक्ष विष्णू सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मुक आंदोलन पाटण तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आले.
         आंदोलनामध्ये पाटण शहर व पाटण तालुक्यातील सर्व विभागाचे कार्यकारणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाटण तालुकाध्यक्ष विष्णू सपकाळ, पाटण तालुका उपाध्यक्ष दादासाहेब पवार, विक्रम महिपाल, तानाजी झेंडे, रामभाऊ जाधव, संजय चव्हाण, राज्य सदस्य रामभाऊ पवार, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस बाबुराव पवार, पाटण तालुका मतदारसंघ आध्यक्ष सतिश पवार, पाटण तालुका कार्यध्यक्ष पांडुरंग कानडे, शहराध्यक्ष वैभव पवार, पाटण तालुका सदस्य वसंत कदम, आशोक महिपाल, सचिन गायकवाड, हरी माने, पाटण तालुका संघटक आनिल कदम, पाटण तालुका खजिनदार संजय पवार, मल्हारपेठ विभाग अध्यक्ष जगदीश जाधव, पाटण शहर संघटक बापुराव चव्हाण, सुरेश जाधव, सुरेश सुर्वे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.