सातारा तब्लिग जमातीने उच्चांकी रक्तदान करित आदर्श निर्माण केला - महेश भोसले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानास प्रतिसाद
बालाजी ब्लड बँक व अक्षय ब्लड बँकेच्यावतीने मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान
सातारा (लक्ष्मीपुत्र) - सातारा तब्लिग जमातीने सातारा जिल्ह्यातील रक्तदानाचा आजपर्यंतचा उच्चांक केला असून सातारा तब्लिग जमातीच्या रक्तदानामुळे थायलेसेमिया व इतर रुग्णांना बलिदान मिळाले आहे. 630 जणांनी रक्तदान करत सातारा तब्लिग जमातीचे कार्य हे इतरांसाठी आदर्शवत आहे, अश्या शब्दात बालाजी ब्लड बँकेचे व्यवस्थापक महेश भोसले यांनी सातारा तब्लिग जमातीचे कौतुक केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी व अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी लाईव्ह मुलाखतीद्वारे तमाम महाराष्ट्राच्या जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा तब्लिग जमातीचे अमिरसहाब अनिसभाई तांबोळी यांनी हाजी जलालूद्दीन सहाब रहेमतुल्लाही अलईही यांच्या स्मृति प्रित्यर्थ सातारमधील गेंडामाळ कबरस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अमिरसहाब अनिसभाई तांबोळी, सादिकभाई शेख, शकील शेख, शफीक शेख, मुबिन महाडवाले, मोहसीन बागवान, अमजद शेख, निसार मुल्ला, सिद्दीक खान, जुबेर बागवान व इतर उपस्थित होते.
सातारा जिल्हा तब्लिग जमातीच्या कौतुकास्पद उपक्रमामुळे बालाजी ब्लड बँक व अक्षय ब्लड बँकेच्यावतीने अमिरसहाब अनिसभाई तांबोळी यांना मानचिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
अल्पावधीत झालेल्या नियोजनाला मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील आजपर्यंतचा एकदिवसातील रक्तदानाचा सर्वात मोठा उच्छांक गाठत रक्तदान केले.स्वतः अमिरसहाब अनिसभाई तांबोळी यांच्या मार्गदर्शन व नियोजनात झालेल्या ह्या रक्तदान शिबिरामध्ये सोशल डिस्टनसिंग, निर्जंतुकीरण यांची परिपूर्ण दक्षता घेण्यात आली होती. नियोजनातील सुसूत्रता, शासनाचे सर्व नियमांचे पालन करित उच्चांकी रक्तदान हा पुढील 2 - 3 दिवस सातारा जिल्हा तसेच परजिल्ह्यातील नागरिकांच्या साठी कुतूहलाचा व कौतुकाचा विषय राहिला होता. सातारा जिल्हा व महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील बांधवांनी सातारा तब्लिग जमातीच्या सुनियोजित झालेल्या उच्छांकी रक्तदानच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे व छायाचित्रांचे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्हावासीयांना देखील रक्तदान शिबिर घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
सातारा जिल्हा तब्लिग जमातीच्या उच्चाकी रक्तदानाचे अनुकरण करीत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मोठ मोठ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात 2014 साली कूपर कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सर्वाधिक 429 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. परंतु सातारा तब्लिग जमातीच्या शिबिरामध्ये 630 जणांनी रक्तदान करत आजपर्यंतचा उच्चांकी रक्तदान केले असून रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल बागवान यांनी केले, तर सतीश भोसले यांनी आभार मानले.
---------------------------------------------
कोणत्या मानचिन्ह व सन्मानासाठी व रेकॉर्ड करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवहानानुसार महाराष्ट्रवासीयांच्या समोर असलेली अडचण दूर करण्यासाठी व देशसेवा करण्यासाठीच हे शिबिराचे आयोजन केले होते. ज्या ज्या वेळेस राष्ट्राला गरज असेल त्या त्यावेळेस सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तब्लिग जमातीचे अमिरसहाब अनिस तांबोळी यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा