महावितरण कंपनीचा ग्राहकांना मनस्ताप

 ग्राहकांची पिळवणूक थांबवावी - एकनाथ बागडी 


              कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोनामुळे तीन महिन्यांपासून सर्वत्र महासंकट चालू असून या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव वीज बील येत असल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे. महावितरण कंपनी मनमानी कारभार करत असल्याने बीलामुळे ग्राहकांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड शहर प्रमुख एकनाथ बागडी यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे केली आहे.
             महावितरणने अंदाजे रिडिंग घेऊन बिले देण्यापेक्षा चालू रीडिंग बिले घेतल्या शिवाय नागरिकांची वीज बीले तयार करू नयेत. वाढीव विज बीले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून वीज बील भरणा करण्यासाठी व वीज बीलाची रक्कम कमी करून घेण्यासाठी कंपनीमार्फत अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. यामुळे वीज बील भरणा केंद्रावर नागरिकांच्या रांगा वाढत असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. सदर सर्व बाबींचा विचार करून कोरोना काळातील वीज बीले माफ करावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टी कराड यांच्यावतीने  करण्यात आले आहे. तसेच बीला संदर्भात काही तक्रार असल्यास कराड शहराध्यक्ष यांच्या नंबरवर 9822449444 या वर संपर्क साधावा.
             कराड शहर भाजपा व शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यावतीने सदर निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे, प्रांताधिकारी दिघे, मा.  एम. एस. इ. बी चे अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी कराड शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, सरचिटणीस राहुल भिसे, महिला मोर्चा कराड शहराध्यक्षा सौ. सीमा घार्गे, अनुसूचीत जाती कराड शहराध्यक्ष सागर लादे, शुभम पवार, इसाक मुजावर, विवेक भोसले, क्षीरसागर इ. उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.