सातारा जिल्ह्यात २८ जून पासून सलून पार्लर चालू करणार
स्वाभिमानी नाभिक संघटनेचा एल्गार
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडावकर) - कोरोनाच्या संकटकाळात व्यवसायिकांची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडली आहे. या सर्व व्यवसायिकांनी नवीन दुकान टाकले आहेत त्यांचा तोटा मोठ्या प्रमाणात झाला आहे. लपून छपून व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःची व गिऱ्हाइकांची काळजी घेऊन व्यवसाय चालू करण्यासाठी 28 जून पासून सलून पार्लर चालू करणार आहेत.
स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य
यांच्यावतीने मा मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन सातारा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे शुक्रवार दि. १२ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुक आंदोलन करुन राज्य अध्यक्ष मा श्री शंकरराव गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सातारा जिल्हा अध्यक्ष आधिकराव चव्हाण यांच्या उपस्थित निवेदन दिले आहे. व सोमवार दि.१५ जून रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसीलदार साहेब यांच्या द्वारे मुख्यमंत्री साहेब यांना निवदने देण्यात आली. तरी आजपर्यंत सरकारने काहीही निर्णय घेतला नाही.
आज कोरानाच्या रोगामुळे गेली ४ महिने सलुन व पार्लर बंद आहेत. त्यामुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत आला आहे. काही सलून कारागिरांनी आत्महत्या केल्या आहेत, आणि काही दिवस सलून दुकाने बंद राहिल्यास नाभिक समाज आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील नाभिक समाजावर ती वेळ येऊ नये म्हणून स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य अध्यक्ष मा श्री शंकरराव गायकवाड यांनी महाराष्ट्रातील सलून पार्लर उघडण्यास आदेश दिला आहे.
आदेशावरून सातारा जिल्ह्यातील सलून पार्लर कारागीर यांच्याकडे पी पी किट (ड्रेसकोड), फेसशिल्ड ग्लास संपूर्ण चेहऱ्यावर मास्क, हँडक्लोज, सेनिटायजर, शोशल डिस्टंस, आँपयमेंट घेऊन कस्टमर घ्यावे व येणाऱ्या ग्राहकांचे नाव व मोबाईल नंबर नोंद करून घ्यावे. हे सर्व साहित्य ज्या सलूनमध्ये, कारागिराकडे उपलब्ध असणार आहे त्यांनीच रविवार दि. २८ पासुन, सकाळी ९ ते ५ पर्यंत सलुन पार्लर दुकाने उघडावी असे आव्हान सातारा जिल्हा अध्यक्ष आधिकराव चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा