सर्वसामान्यांचा असामान्य नगरसेवक मोहसीन आंबेकरी

श्रावणबाळ योजनेमधून 29 महिलांना प्रमाणपत्राचे वाटप..... 390 पेक्षाही जास्त महिलांना पेन्शन सुरू 


              कराड (लक्ष्मीपुत्र) - संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेमधून वार्ड क्रमांक 14 मधील गरीब, गरजू व निराधार 29 महिलांना सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी व नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्या अथक प्रयत्नाने पेन्शन चालू करून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम झाल्याने निराधार महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
            अनेक गरीब, गरजू व निराधार महिलांना पेन्शन मिळवून देण्यास नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांच्या अथक प्रयत्नांना आज यश आले असून श्रावण योजनेमधून शासन मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप महिलांना करण्यात आले.
             गरजू व निराधार महिलांना श्रावणबाळ योजनेमधून पेन्शन चालू करून आत्तापर्यंत 390 पेक्षाही जास्त लोकांना याचा लाभ गोरगरीब लाभार्थींना पोहोचवले असून औषधोपचार, प्रवास, जीवनावश्‍यक वस्तूंना नक्कीच याचा हातभार लागतो आहे याचा मला मनापासून आनंद होत असून हे काम करणे म्हणजे खरंच मनाला समाधान मिळणारे असल्याचे मत नगरसेवक मोहसीन आंबेकरी यांनी सांगितले.
           सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी म्हणाले, श्रावण वा योजनेसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारच्या योजना मी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. श्रावणबाळ योजनेमधून ज्या लाभार्थ्यांना पेन्शन चालू झाली आहे अशा लाभार्थ्यांनी आपल्या आजूबाजूस व नातेवाईकांमध्ये कोणी गरजू असल्यास मला नक्कीच संपर्क करा. मी व माझे सहकारी मिळून त्यांचीही मदत करण्यास सक्षम असुन तरी असे कोणी या योजने पासून वंचित असेल तर माझ्याशी किंवा आपल्या हक्काचा, सर्वसामान्यांचा असामान्य सेवक नगरसेवक मोहसीन आंबेकरी  यांच्याशी संपर्क साधावा असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला चांगल्या काम करण्याची प्रेरणा मिळते.त्यामुळे समाजामध्ये असणाऱया गोरगरीब निराधार महिलांना मदत करताना प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तलाठी जंगम यांचे मनापासून धन्यवाद करतो असेही शेवटी अख्तर आंबेकरी म्हणाले.
              कार्यक्रमास नगरसेविका सुनंदा शिंदे, रयत क्रांती संघटना सातारा जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी, चाँद पालकर, रहिम इबुसे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.