पाटण तालुक्यात बांधकाम विभागाचा भ्रष्टाचाराचा बोकाळला बकासुर

पाटण तालुक्यात बांधकाम विभागाचा भ्रष्टाचाराचा बोकाळला बकासुर


             मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडावकर) - पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ  पाटण ते काहीर रस्ता ग्रा. मा. 212 कि. 0/00ते  8/500km ची दुरूस्ती करणे ता. पाटण जि. सातारा ऑनलाईन टेंडर नं. 52395 निविदा क्र B. 1/अ. अ. 8/2016-2017 वर्क ऑर्डर आदेश 5/10/2016 रोजीचा आहे. व हे काम 26/12/2018 ला फायनल केले आहे. व प्रत्यक्षात पैसे मिळायला फेब्रुवारी 2020 रोजी उजाडला असल्याने बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
                सदर काम करण्यासाठी एक वर्षाची मुदत असताना चार वर्ष लागतात लागत असल्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार दिसून येत आहे. त्यामुळे या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा रंगली आहे. मा.गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा जिल्ह्यात एकमेव पाटण तालुक्यात 180 कोटीची भरीव विकास कामे केली आहेत. परंतु अधिकारीवर्ग स्वतःच्या स्वार्थापोटी विकासाला रोखण्याचे काम करत असल्याचे उघड झाले अाहे. या अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे काही ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली असुन ठेकेदारांचे व्यवसाय बंद झाले आहेत. तर काही जण व्यवसाय बंद करण्याचा विचार करत असल्याची माहिती ठेकेदार संदीप कोळेकर यांनी दैनिक लक्ष्मीपुत्र शी बोलताना व्यक्त केली.
              बांधकाम विभागातील शाखा अभियंता हे बोगस इस्टिमेंट  बनवून ते पास  करतात आहेत.थर काही अधिकाऱ्यांचा रुबाब हा एखाद्या आमदाराला लाजवेल असा आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावी अशी जनतेतून व ठेकेदारांमधून मागणी जोर धरू लागली आहे. बांधकाम विभागातील काही अधिकारी कित्येक वर्ष ठाण मांडून बसले आहे. त्यांच्या अनेक तक्रारी वरिष्ठांना कळवून, लेखी पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे.

( सदर कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून या अधिकाऱ्यांची क्वालिटी कंट्रोल बांधकाम खात्यांतर्गत न्यायालयीन चौकशी व फौजदारी गुन्हा नोंद करावा. तसेच लाचलुचपत खात्यांतर्गत अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी ठेकेदार संदीप कोळेकर यांनी केली आहे. )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.