येराड (बनपेठ) येथे विजेचा शॉक लागून म्हैस ठार
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - बनपेठ (ता. पाटण) येथील पांडूरंग गणपती साळुंखे यांच्या म्हैशीसह मुलगा व पत्नीस वीजेचा शाॅक लागून दहा महिन्याची गाभण म्हैस जागेवर मरण पावली आहे. तर पत्नी व मुलगा या दोघांना विजेच्या झटक्याने दुर फेकले गेले. गत अनेक वर्षापासुन धोकादायक स्थितीत असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे अनेकांना शाॅक लागला असुन याबाबत वीज कार्यालयाला वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग साळुंखे यांची पत्नी सुनंदा साळुखे (वय 46) व मुलगा श्रीराम (वय 23) हे म्हैशीला चरायला रानात घेऊन जात होते. हे गणेशनगर येथील ट्रान्सफार्मर पासुन सुमारे दहा फुट अंतरावरून जात असताना अचानक या तिघांना वीजेचा शाॅक लागला. यामधे दहा महिन्याची गाभण असलेली म्हैस जागेवरच मरण पावली, तर सोबतच्या दोघांना वीजेचा शाॅक लागुन विजेच्या झटक्याने ते दुर फेकले गेले. यावेळी रस्तावरून जाणार्या ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात पाटण येथे नेण्यात आले. दैव बलवत्तर म्हणुन त्यांचा जीव वाचला.
घटनास्थळी गावकामगार तलाठी पीजी शिंदे यांनी पंचनामा करण्यात आला. व पशुवैद्यकीय विभागाचे कर्मच्याऱ्यांनी शवविच्छेदन केले आहे. वीज वितरणचे अभियंता एफ ए मुलाणी व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बनपेठ येथील हा ट्रान्सफार्मर गत अनेक वर्ष धोकादायक जागेत असुन या सभोवताली सुरक्षेसाठी काहीही केले नाही. उघड्यावर असलेला ट्रान्सफार्मरच्या शेजारी लोकवस्ती असुन याठिकाणी लहानमुलांसह लोकांची व जनावरांची नेहमी वर्दळ असते. या अगोदरही अनेकदा शाॅक लागण्याचे प्रकार घडले होते. तरीही वीज वितरण विभागाने गाभीर्याने पाहिले नाही. पांडुरंग साळुंखे यांचे उदरनिर्वाह साधन असलेली सुमारे साठ हजार रूपये किंमतीची म्हैस मेल्याने त्याच्या हातातोंंडाशी आलेला घास हिरवाला गेल्याने घटनास्थळी उपस्थितांचे मन हेलावुन जात होते.
आमच्या वस्तीसह ग्रामस्थांच्या जीवीतास धोकादायक असलेला ट्रान्सफार्मर वीज वितरण विभागाने तात्काळ स्थलांतर करावा.
शंकर शिंदे, माजी सरपंच, ग्रामपंचायत बनपेठ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा