आमदार शंभूराजे देसाई यांची जनतेप्रती असणारी संवेदनशीलता
महाराष्ट्राच्या राजकारणातील पोलादी पुरुष म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा उल्लेख केला जातो. नुकताच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारकाचे उदघाटन दौलतनगर (ता. पाटण) येथे मोठ्या दिमाखदार समारंभात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यकाळामध्ये म्हणजेच विविध खात्याचे मंत्री असताना सर्वसामान्य लोकांना फायदा झाला पाहिजे व गरीब, गरजू लोकांना राज्य शासनातर्फे मदत झाली पाहिजे, त्याचबरोबर आर्थिक दुर्बलांना शिक्षणाची सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी घेतलेल्या निर्णयांचा या ठिकाणी ऊहापोह करण्यात आला. वास्तविक पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सारखा लोहपुरुष पुन्हा महाराष्ट्रात झालाच नाही असे म्हणावे लागेल.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी गतकाळामध्ये महाराष्ट्र शासनातील विविध मंत्रिपदाचा कार्यकाळामध्ये केलेल्या कामात नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. तेव्हा त्यांना मानणारे नव्हे तर तत्कालीन परिस्थितीत विरोधक असणारे सुद्धा त्यांच्या विचाराने प्रभावित झालेले होते. म्हणूनच क्षमता असताना बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित ठेवले गेले अशी खंत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई हे काँग्रेस विचारसरणीचे होते. काँग्रेससाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. वास्तविक त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पाटण या मतदारसंघामध्ये त्यांचे उचित स्मारक होणे आवश्यक होते. त्यासाठी बराच प्रयत्न झाला मात्र काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना स्मारकाला शुभमुहूर्त मिळाला नाही अथवा तत्कालीन सरकारमध्ये असणाऱ्या मंत्रीमहोदय व मुख्यमंत्र्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासाठी सकारात्मक दाखवला नाही याची खंत व दुःख विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेचे आमदार म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघाचे शंभूराज देसाई हे प्रतिनिधित्व करीत आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असणारे आमदार शंभूराज देसाई तितक्याच तडफदारपणे व जनतेच्या प्रति सद्भावना व्यक्त करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनस्तरावर लढत असतात. पाटण तालुका हा डोंगराळ - दुर्गम, वाड्या-वस्त्यांमध्ये विखुरलेला तालुका आहे. या ठिकाणी छोट्या - छोट्या वस्त्या आहेत. या छोट्या वस्त्यांमध्ये पन्नास ते शंभर कुटुंब राहणारे आहेत. या डोंगरकपारीतील लोकांना रस्ता, पाणी, आरोग्य सुविधा अद्यापपर्यंत मिळाल्या नाहीत, या सुविधा देण्यासाठी आमदार शंभूराजे देसाई सातत्याने प्रयत्न करतात, हे उल्लेखनीय आहे. कारण डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या या लोकांना सुविधा देण्यासाठीच लोकप्रतिनिधी असतात याचे भान मात्र आमदार शंभूराज देसाई यांना आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी जे महाराष्ट्रामध्ये काम केले त्याचप्रमाणे व त्यांनी आखून दिलेल्या पायवाटेने वाटचाल करण्याचा प्रयत्न आमदार शंभूराज देसाई करीत आहेत.
पाटण विधानसभा मतदार संघापुरता ते विचार करतात, कारण पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या छोट्या-छोट्या वाड्यांना सर्व सुविधा देण्यासाठी शासनस्तरावर त्यांना लढावे लागते, मंत्रिमहोदयांना त्याचे महत्त्व सांगून प्रसंगी कायद्यामध्ये बदल करून निधी मिळवावा लागतो, यासाठी आमदार शंभूराज देसाई यांची बरीच शक्ती खर्च होते. यामुळे राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता असतानाही शंभूराज देसाई केवळ पाटण तालुका सर्वांग सुंदर व विकासाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून पाटणच्या जनतेने लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावर जसे प्रेम केले, त्याचप्रमाणे सध्या पाटणची जनता आमदार शंभूराज देसाई यांच्यावर अलोट प्रेम करीत आहे. हे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी, पाटण तालुक्यातील प्रत्येक गावातून अनेक माता - अबाल वृद्ध स्त्री-पुरुष उपस्थित होते, यावरून स्पष्ट होत आहे.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार शंभूराजे देसाई यांच्या मित्रत्वाचा ऋणानुबंध सातारा जिल्हा जाणतो आहे. या मित्रत्वाच्या संबंधांमुळेच आणि शंभूराज देसाई यांच्या काम करण्याच्या चिकाटीमुळे, सर्वाधिक सातारा जिल्ह्यात निधी कोठे आला असेल तर तो पाटणला. हे विरोधकांनाही मान्य करावे लागेल.लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर राज्य व केंद्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी याला सकारात्मकता दर्शविली आहे. हे पाटणच्या जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या उद्घाटन समारंभातील सर्वात महत्त्वाचा व आम्हाला भावलेला प्रसंग म्हणजे आमदार शंभूराज देसाई हे बोलत असताना त्यांनी लोकनेत्यांबद्दल भावना व्यक्त केली, पाटणच्या जनतेबद्दल आपले मत व्यक्त केले आणि पाटणच्या जनतेला राज्य शासनाकडून काय अपेक्षित आहे आणि ते विद्यमान मुख्यमंत्री, मंत्रीमहोदय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर व्यासपीठावरील मुख्यमंत्र्यांसह, मंत्रीमहोदय एकमेकाकडे पाहून शंभूराज देसाई यांची समयसूचकता, संधीचा फायदा घेणे, तेही जनतेसाठी असे एकमेकांना खुणावत होते. काम करण्याच्या पद्धतीबद्दल कौतुक करीत होते. म्हणूनच आम्हाला या ठिकाणी लिहिताना असे सांगावेसे वाटते, आमदार शंभूराज देसाई यांच्या सारखा जनतेप्रती सदभावना असणारा, जनतेसाठी झटणारा, जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, जनतेच्या दुःखात सहभागी होणारा, जनतेला सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी काम करणारा आमदार मिळाला आहे, म्हणजेच पाटणची जनता खऱ्या अर्थाने नशिब्वान म्हणता येईल.

साहेब खुप छान
उत्तर द्याहटवा