सुंदरगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - पाटण महालातील सुंदर गडावर( दातेगड )346 व छत्रपती शिवराज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गड परिसरातील शिव मावळ्यांनी सकाळी भगवा ध्वज हातात घेऊन शिवगर्जनेत गडावर प्रवेश केला. यावेळी गड स्वच्छता गड पूजन व गडावरील देवदेवतांची पूजा करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक करण्यात आला. व प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिव मावळ्यांनी शिव गर्जना करून छत्रपती शिवरायांना वंदन केले.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर निसर्गसंपन्न परिसरात असलेल्या या किल्ल्यावर गड परिसरातील मावळ्यांसह व सुंदरगड (दातेगड) संवर्धन समितीच्या मावळ्यांनी 346 वा शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त गडावर सकाळपासूनच हजेरी लावली. यावेळी मावळ्यांनी सर्वप्रथम गड स्वच्छता मोहीम राबवून गड पूजन, भगवा ध्वज पूजन करून ध्वजास मानवंदना दिली. गडावरील देवतांचे पूजन करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला.व दिन साजरा केला व दिन साजरा केला. यावेळी उपस्थित मावळ्यांनी शिव प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून शिवगर्जना छत्रपती शिवरायांचा जयजयकार केला. कोमल मांडवकर या शिवकन्या शिव पोवाडा गाऊन किल्ल्यावरील वातावरण मंत्रमुग्ध केले. यावेळी शिवप्रेमी प्रा. मनोहर यादव प्रा. युसुफ हकीम, योगेश नलवडे, लक्ष्मण चव्हाण, संतोष मानसिंग, यांनी आपले विचार व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गड किल्ल्यांचे संवर्धन करून आजच्या पिढीसमोर छत्रपतींचा इतिहास रुजवला पाहिजे. याच बरोबर छत्रपती शिवरायांनी ज्या गडावर भगवा फडकवला त्या प्रत्येक गडावर शिवजयंती व शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
सुंदरगडावर झालेल्या शिवराज्यभिषेक दिनास अविनाश परडकर, शंकर मोहिते, आनंदा मोळावडे, सुशांत शिंदे, चंद्रकांत बामणे, किशोर थरवल, संतोष मारसिंग, यांच्यासह परिसरातील मावळे व सुंदर गड संवर्धन समितीचे शिव मावळे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा