मास्कची विक्री करून एक हजार सातशे रुपयांरु धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

कोपर्डे हवेली येथील विजय चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी घरी शिलाई मशीनवर मास्क बनऊन दोन रुपयांना विक्री करून मदत
पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद
कराड (लक्ष्मीपुत्र) - करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19 ) च्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदाना द्यावे असे आवाहन केले होते.या आवाहनास प्रतिसाद देत कराड उत्तर मतदार संघात असणाऱ्या कोपर्डे हवेली ता. कराड येथील विजय चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी त्यांच्या घरी असणाऱ्या शिलाई मशीनवर मास्क बनऊन त्यांनी दोन रुपये प्रमाणे मास्कची विक्री केली व त्यातून जमा होणारी रक्कम रुपये १७००/- चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड 19) साठी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त केली.
विजय चव्हाण हे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते असून त्यांनी नामदार बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम रुपये १७,००/- चा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला.
विजय चव्हाण हे कराड येथील एका दुकानात कामाला आहेत तर त्यांच्या पत्नी महिलांच्या कपड्यांचे शिवणकाम करतात.लॉकडाउन मुळे विजय चव्हाण यांना कराडला जाता येत न्हवते.त्यामुळे आपण कोरोनाचा पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य करू शकतो या हेतूने त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगनवाडी सेविका याना मोफत मास्क वाटप केले. त्यानंतर त्यांनी बनविलेल्या मास्कची नाममात्र दोन रुपये दराने विक्री करुन सामाजिक कार्यात हातभार लावावा ये हेतूने त्यातून जेवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीसाठी देण्याच्या निर्णय घेतला व त्यातून जमा झालेल्या रकमेचा धनादेश राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त केले.
विजय चव्हाण यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून पती, पत्नी शिलाई मशीनचा व्यवसाय करतात. सामाजिक भावनेतून ते नाममात्र दराने मास्क पुरवत असल्याने त्यांचे समाजतून कौतुक केले जात आहे.त्याचप्रमाणे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा