आ. सुजित मिणचेकर यांचे कार्य कौतुकास्पद - खा. धैर्यशील माने

आ. सुजित मिणचेकर यांचे कार्य कौतुकास्पद - खा. धैर्यशील माने 



             हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - कोरोना सारख्या महामारीच्या युध्दात स्वतःच्या परिवाची, आपल्या जीवाची पर्वा न करता नगरपरिषद कर्मचारी, सफाई कामगार, आशा वर्कर यांनी आहोराञ सेवा देण्यासाठी आपले योगदान दिले आहे. अशा या कोरोना योध्द्याचे ॠण फेडण्यासाठी शिवसेना मा. आमदार सुजित मिणचेकर यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचे फार मोठे काम केले आहे. हे त्याचे कार्य खरोखर कौतुकास्पद असल्याचे मत शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.
             ते शिवसेनेच्यावतीने हुपरी नगरपरिषद व रेंदाळ ग्रामपंचायत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तू किट वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हुपरी व रेंदाळ मधील जवळपास दोनशे वर कर्मचाऱ्यांना खासदार धैर्यशील माने, मा. आमदार सुजित मिणचेकर, नगराध्यक्षा सौ जयश्री गाट, मुख्याधिकारी स्नेहलता कुभांर, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
              याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख विनायक विभूते, शहर प्रमुख अमोल देशपांडे, शहर संघटिका मीना जाधव, रघुनाथ नलवडे, राजकुमार पिपंळगावकर, सताजीराव देसाई, शहाजी गायकवाड, संदिप भंडारे, प्रकाश गाट, संभाजी हांडे, सुहास सपाटे, पक्षप्रतोद रफिक मुल्ला, जयकुमार माळगे, राजेंद्र साळोखे, नगरसेविका लक्ष्मी साळोखे, सुप्रिया पालकर, विजयश्री करडे,वैशाली कोथळे, कविता सदरेकर रेदाळचे सरपंच विजय माळी, शिवाजी पाटील बापू, महिपती पाटील, दिपक पुजारी, वामन कांबळे आदी सह ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
            खासदार धैर्यशील माने पुढे म्हणाले, आज जगातील सर्व नागरिकांनी या कोरोना विषाणूने माणूसकीने जगण्याचा मौलिक धडा दिला आहे. या माणुसकीच्या नात्याला जपल्यामुळेच आपल्या राज्यात कोरोनाला रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत . भविष्यात या विषाणू सोबत आपणास जग भविष्यात या विषाणू सोबत आपणास जगायचे आहे त्यामुळे एक मेकांना साथ देण्याचे आवाहन शेवटी त्यांनी व्यक्त केले.
              आमदार सुजित मिणचेकर म्हणाले, तुम्ही कोविड योध्द्यानी या काळात जनतेच्या रक्षणासाठी फार मोठे काम केले आहे. पद असो वा नसो आपुलकीच्या भावनेतून आपण शिवसेनेच्या वतीने तुम्हाला ही छोटीशी मदत करत आहे. त्याचबरोबर येथून पुढील काळात आपण सर्वांनी चिनी वस्तू वर बहिष्कार टाकावा असे आवाहन केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.