पाटण तालुक्यातील मोरणा विभाग कोरोना मुक्त
कोरोना मुक्त मोरणा विभाग, पाच योध्द्यांची कोरोनावर मात
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - मोरणा विभागातील गोकुळ तर्फे पाटण व मोरेवाडी, पेठशिवापूर येथील सापडलेले पाच कोरोना पेशंटचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथून ०३/०६/ २०२० रोजी ३ कोरोना योध्द्धे व ०६/०६/२०२० रोजी २ योध्द्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे.
पाच जणांचे कोरोनावर मात करून गावामध्ये आल्यानंतर त्यांचे नागरिकांनी स्वागत केले. व त्यांना काही दिवस वैद्यकीय सल्ल्यानुसार इतरांशी संपर्क न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सदरचे पेशंट कोरोना मुक्त झाल्याने मोरणा विभागात सध्या सर्व नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाली असुन, गावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर पेशंटना उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगिरी चे सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी त्याच प्रमाणे गट विकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे प्रांत साहेब, तहसीलदार, पोलिस अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, शिपाई, सफाई कामगार आणि विशेषता या पेशंटला सरकारी कोरोना टाइम झोन मद्ये त्यांची काळजी घेण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभुराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदर पेशंटची काळजी घेण्याच्या सुचना दिल्या.त्याचप्रमाणे विभागातील कोरोना झोनमध्ये असणाऱ्या गावांमध्ये योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या.
या सर्वांनी योग्य काळजी घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. तरी देखील मोरणा विभागातील नागरिकांनी कोरोना संसर्गापासून काळजी घेण्याच्या सूचना ना. शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. त्याबद्दल माननीय नामदार शंभूराजांचे व वैद्यकीय, महसूल, पोलिस विभाग, शिक्षण विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वांना त्या कुटुंबातील लोकांनी व विभागातील जनतेने धन्यवाद दिले. त्याच प्रमाणे कोरोना मुक्त झालेल्या कुटुंबाचे स्वागत माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय बशीर भाई खोंदू यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा